सोप्या किचन टिप्स

रविवार, 9 मे 2021 (17:08 IST)
* बटाटे नेहमी थंड आणि अंधारात ठेवा कांद्यासह ठेवू नका.नाही तर त्याला कोम येतात. 
 
* बाजारातून अंडी आणल्यावर एक दोन दिवसातच ते खराब होतात अंडी बऱ्याच दिवस फ्रेश ठेवायचे असेल तर त्यावर तेलाचा हात लावून फ्रिजमध्ये ठेवा.
 
* कांदा चिरल्यावर किंवा कोणती भाजी चिरल्यावर हाताला वास येतो. बेकिंग सोड्याने हात धुवा वास निघून जाईल. 
 
* केळी लवकर काळे पडू नये आणि पिकू नये यासाठी केळीच्या वरील भागावर प्लास्टिक किचन रॅपिंग शीट गुंडाळून द्या.केळी ताजे राहतील.
 
* लसूण जास्त प्रमाणात सोलून एका हवाबंद डब्ब्यात ठेवून द्या. आपण 15 -20 दिवस लसूण चांगले ठेऊ शकता.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती