स्वयंपाकघरात महिलांचा बराच वेळ जातो. जेवण बनवण्यापासून अन्नपदार्थांची साठवणूक करेपर्यंत महिलांना बरंच काही करावं लागतं. त्यातच भाज्या, त्यातही पालेभाज्या ताज्या ठेवणं हे मोठं आव्हान असतं. यासाठी स्वयंपाकघरातल्या या टिप्स उपयोगी पडतील.
* पालेभाज्या ओलसर होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातच आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे कंटेनर्स असतातच असं नाही पण पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी सोपी पद्धत वापरता येईल. कंटेनरमध्ये भाजी ठेवा. त्यावर पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपर गुंडाळा. त्यावर प्लास्टिक गुंडाळा. पेपर टॉवेलमुळे पालेभाजीतला सगळा ओलावा शोषला जाईल. पालेभाजी बराच काळापर्यंत ताजी राहील.