ताजे मासे कसे ओळखावे? बाजारातून मासे आणताना ही काळजी घ्या
मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (16:39 IST)
ताजे मासे ओळखणे देखील एक कला आहे आणि मासा विकत घेताना काळजी घेणे आवश्यक आाहे. मासे निवडून कापून आणि काटे काढून आणणे देखील महत्त्वाचं काम असतं. जाणून घ्या मासे कसे निवडावे-
ताजे मासे दिसायला तरतरीत व चकचकीत ओलसर दिसतात.
मासा कडक आणि ताठ असावा.
मरगळलेले मासे घेऊ नये.
ताज्या माशांना किंचीत हिरमुस वास असला तरी घाण- कुजकट वास येत नाही.
ताज्या माश्याचे डोळे चकचकीत आणि पारदर्शक दिसतात. लालसर किंवा धुरकट पांढरे डोळे असेलेले मासे घेऊ नये.
ताज्या माशांच्या तुकड्यांवर पारदर्शक पांढऱ्या रंगाची झाक असते.
मोरी, मुशीसारखे मासे समोर कापून घ्यावे.
पापलेटच्या कल्ल्यातून पांढरा द्रव येत असल्यास ते ताजे समजावे.