हिवाळ्यात सुद्धा कडधान्यांना झटपट मोड येतील, या ट्रीक अवलंबवा

सोमवार, 9 डिसेंबर 2024 (12:59 IST)
Kitchen Tips : मोड आलेले कडधान्य हे आरोग्यासाठी अतिशय चांगले मानले जाते. कडधान्याचे सेवन केल्याने शरीराला प्रोटीन मिळते. तसेच मूग, मठ, हरभरा, चवळी हे कडधान्य मोड आलेले सेवन केल्यास अनके फायदे मिळतात, पण अनेक वेळेस हिवाळ्यामध्ये हवे तेवढे आणि लवकर अंकुर येत नाही. याकरिता आज आपण पाहणार आहोत की, हिवाळ्यामध्ये आपण कडधान्य अंकुरित कसे करू शकतो. तर जाणून घ्या या काही ट्रिक. 
 
सर्वात आधी कडधान्य स्वच्छ धुवावे आणि रात्री पाण्यात भिजत घालावे. आता दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांना स्टीलच्या गाळणीत ठेवावे. यामुळे पाणी वेगळे होईल. आता आपण त्यांना अंकुर येण्यासाठी ठेवू शकता.
 
1.गॅस जवळ ठेवा-
हे कडधान्य सुती कापडात बांधून ठेऊन हाताच्या मदतीने कापड हलके ओले करा. आता हे  स्वयंपाकघरात गॅसजवळ ठेवावे. गॅसजवळ ठेवल्यास त्याला उष्णता मिळाले. ज्यामुळे कडधान्य लवकर अंकुरित होईल. 
 
उबदार कपड्यामध्ये ठेवावे-
कडधान्यला मोड लवकर येण्यासाठी एक रुमाल घेऊन तो गरम पाण्यात भिजवून पिळून घ्या. आता त्यात कडधान्य नीट गुंडाळा आणि टिफिन किंवा कोणत्याही बॉक्समध्ये किंवा उबदार ठिकाणी ठेवा. असे केल्याने मोडही लवकर येतात.
 
उन्हात ठेवा-
कडधान्य सूतिकापडामध्ये बांधून उन्हात काही काळ ठेवावे. यानंतर, त्यांना लागलीच स्टीलच्या बॉक्समध्ये बंद करावे. दुसऱ्या दिवशी छान मोड येतील. 
 
गरम पाण्यावर ठेवा-
एका पॅनमध्ये पाणी उकळवून घ्यावे. वरती स्टील गाळणे ठेऊन कडधान्य कापडात ठेवावे आणि हे कापड चाळणीवर गुंडाळा आणि झाकून ठेवा. यामुळे मोड लवकर निघतील. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती