इथे आम्ही पाककलेची आवड असणाऱ्यांसाठी सोप्या 10 पाक टिप्स सांगत आहोत..
* वाचलेल्या टोस्टला टाकून देऊ नका. त्याला हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाच्या घोळात मिसळून खमंग खुसखुशीत भजी बनवू शकता.
* पालक शिजवताना ह्यामध्ये चिमूटभर साखर घालावी, हिरवा रंग तसाच राहतो.
* भाजीना कुरकुरीत करण्यासाठी बेसनात तांदळाचे पीठ घालावं.
* हातातून लसणाचा दुर्गंध घालविण्यासाठी हातांवर चिमूटभर मीठ चोळावं.
* मठरी खमंग बनविण्यासाठी मैद्यात दही टाकून मळा आणि त्यात गरम तुपाचं मोयन घाला.
* पराठे तेल किंवा तुपात शेकण्याऐवजी लोणीमध्ये शेकावे पराठे जास्त चवदार होतात.
* भजी देताना त्यांवर चाट मसाला भुरभुरा, यामुळे त्याला चांगली चव येते आणि ते अजून चविष्ट लागतात.