Cooking Tips : भाजी किंवा वरणात जास्त मीठ झाले असल्यास, या सोप्या टिप्स अवलंबवा

शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (10:10 IST)
मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाची चव वाढवते किंवा खराब करू शकते. काहीवेळा आपण अन्न शिजवताना चुकून जास्त मीठ घालतो, जे अन्नाची संपूर्ण चव खराब करते. त्यामुळे असे काही किचन हॅक सांगणार आहोत ज्याद्वारे आपण अन्नात जास्त झालेले जेवणातील मीठ संतुलित करू शकता .
 
भाजीमध्ये मीठ जास्त असल्यास त्यात थोडेसे भाजलेले बेसन घालू शकता. त्यामुळे भाजीतले  मीठ कमी होईल. ही टीप आपण ग्रेव्ही आणि कोरड्या दोन्ही भाज्यांमध्ये वापरू शकता. यासोबतच भाजलेल्या बेसनाने ग्रेव्ही घट्ट होईल.
 
भाजी किंवा डाळीत मीठ जास्त असल्यास गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करून त्यात घाला. असे केल्याने जेवणातील मीठ कमी होते. लक्षात ठेवा की अन्न सर्व्ह करण्यापूर्वी, या गोळ्या काढून टाका.
 
भाजी किंवा वरणात मीठ जास्त असल्यास त्यात उकडलेले बटाटे घालून मीठ कमी करता येते. बटाटे भाजी किंवा डाळीमध्ये असलेले अतिरिक्त मीठ शोषून घेतील आणि त्यामुळे ग्रेव्ही घट्ट होईल.
 
जर जेवणात मीठ जास्त असेल तर आपण लिंबू देखील वापरू शकता. भाजी किंवा डाळीत लिंबाचा रस घालून मिक्स करा. असे केल्याने मीठ कमी होईल आणि जेवणाची चव खराब होणार नाही.
 
भाजीत मीठ जास्त असल्यास ब्रेडचाही वापर करू शकता. यासाठी भाजीमध्ये ब्रेडचे 1-2 स्लाईस टाका आणि 10 मिनिटे तसेच राहू द्या. या मुळे अन्नात जास्त पडलेले मीठ कमी होईल. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती