घरात असलेले चांदी, तांबे, पीतळ, कांसे वस्तूंना काही वेळात स्वच्छ करा

बुधवार, 6 मार्च 2024 (08:30 IST)
जर तुमच्या घरात चांदी, तांबे, पीतळ, कांसेच्या देवी-देवता किंवा इतर काही मूर्ति तसेच भांडे असतील आणि ते जर काळे झाले असतील तर चिंतित होऊ नका या सोप्या टिप्स त्यांना चमकवण्यासाठी तुमची मदत करतील जाणून घ्या या सोप्या टिप्स 
 
1. चिंच- चिंच ही प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असते. चिंच 15-20 मिनिटपर्यंत पाण्यात भिजवून ठेवावी आता चिंचेच्या लगदयाला या वस्तूंवर चांगले घासायचे आहे आणि स्क्रब ने साफ करायचे आहे. मग पाण्याने धूवायचे ही सोपी टिप्स तुमच्या घरातील धातूचे भांडे चमकावेल. 
 
2. लिंबू-बेकिंग सोडा- जर तुमच्या घरात  लिंबू-बेकिंग सोडा या दोन्ही वस्तु असतील तर धातुची भांडी लागलीच साफ होतील. याकरिता तुम्हाला फक्त एक लिंबाचा रस बेकिंग सोडयामध्ये मिक्स करून या तयार केलेल्या पेस्टला एका कपडयाच्या साह्याने धातूच्या वस्तूंवर लावायची आहे. काही वेळानंतर गरम पाण्याने धुवून टाकायचे. ही टिप्स तुमच्या घरातील धातूचे भांडे नक्कीच चमकवेल . 
 
3. व्हिनेगर-मीठ- व्हिनेगर हे अनेक घरांमध्ये उपलब्ध असते. घरात असलेले पितळाच्या वस्तू तसेच इतर धातूच्या वस्तूंची चमक परत आणण्याकरिता एका कापडावर व्हिनेगर टाकून ते धातूच्या वस्तूंवर लावणे मग यावर मीठ टाकून स्क्रबने घासावे तसेच नंतर गरम पाण्याने धुवून टाकावे यामुळे धातूच्या काळ्या पडलेल्या वस्तू या चमकतील. 
 
4. लिंबू-मीठ- अर्ध्या लिंबाच्या रसात एक चमचा मीठ मिक्स करून या मिश्रणाला पितळीच्या वस्तूंवर किंवा इतर वस्तूंवर लावून मग गरम पाण्याने धुवावे. या सोप्या टिप्स मुळे घरात असलेले धातूंच्या वस्तू चमकतील. 
 
5. मीठ-पीठ,डिस्टिल्ड व्हिनेगर- घरात असलेली काळी तसेच रंग गेलेली मूर्ति तसेच भांडे स्वच्छ करण्यासाठी अर्धी वाटी पीठ, अर्धी वाटी मीठ आणि अर्धी वाटी डिस्टिल्ड व्हिनेगर या तिघांना बरोबर प्रमाणात घेऊन मिक्स करावे. मग या पेस्टला काळ्या झालेल्या सर्व धातूच्या वस्तूंवर लावावी मग थोड़ावेळ तसेच राहु दयावे. मग नंतर गरम पाण्याने धुवून घ्यावे. यामुळे काळा पडलेले सर्व धातूच्या वस्तू चमकतील. 
 
घरात असलेली पीतळ तसेच इतर धातूच्या वस्तूंना चमक येण्याकरिता लोकल वॉशिंग पावडर किंवा लिक्विड डिश वॉश ने साफ करण्यापेक्षा वरील या सोप्या टिप्स अवलंबवा.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती