Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात रोशन नावाचा एक वृद्ध व्यक्ती राहत होता. आता तो खूप वयस्कर झाला होता ज्यामुळे त्याला तीर्थयात्रेला जावेसे वाटत होते. त्याने आपल्या जीवनात जमा केलेले सर्व पैसे एकाठिकाणी गोळा केले होते. तीर्थयात्रेला जाण्यासाठी त्याने काही पैसे घेतले व बाकीचे पैसे एका पिशवीमध्ये भरले. व पैशाने भरलेली पिशवी तो मित्राला देत म्हणाला की, मित्र ही माझ्या जीवनातील कमाई आहे. आता मी तीर्थयात्रेवर जात आहे. जर मी एक वर्षाच्या आत परत आलो नाही तर तू हे एका चांगल्या कामासाठी खर्च कर.एक वर्षापर्यंत माझे हे पैसे तुझ्याजवळ राहतील. जर मी परत आलो तर मी हे पैसे परत घेईन.
रोशनचा मित्र दीनानाथ म्हणाला की,तू काळजी कर नकोस मी हे व्यवस्थित सांभाळून ठेवेल. तू निश्चित होऊन तीर्थयात्रेवर जा. मित्र दीनानाथ वर विश्वास ठेऊन रोशन निघून गेला. एवढे सारे पैसे पाहून दीनानाथचे मन बदलून गेले. व त्याने सर्व पैसे खर्च करून टाकले.
आता एका वर्षानंतर रोशन तीर्थयात्रेवरून परत आला. व आल्यानंतर रोशन दीनानाथ जवळ गेला व आपले पैसे मागितले पण दीनानाथाने त्याला ओळख दाखवली नाही व घरातून हाकलवून दिले. बिचारा गरीब रोशन खूप दुखी झाला व न्याय मागण्यासाठी बादशाह अकबरच्या दरबारात गेला.
आता बादशाहने दीनानाथला देखील दरबारात बोलावले पण दीनानाथ रोशनला ओळखत नाही असे सांगू लागला. रोशन जवळ आपले म्हणणे खरे आहे हे सांगण्यासाठी कोणताही पुरावा न्हवता. या गोष्टीचा पत्ता लावण्यासाठी बादशहाने बिरबल सांगितले. बिरबलने दोघांची चौकशी केली पण दीनानाथ ठाम राहिला. बिरबलने रोशनला विचारले की तू कोणासमोर पैसे दिले होते. रोशन म्हणाला की मी याला एका आंब्याच्या झाडाखाली पैसे दिले होते. अजून कोणी न्हवते.
याचा अर्थ आहे की तुझा साक्षीदार आंब्याचे झाड आहे.बिरबल पुढे म्हणाला की, त्या आंब्याच्या झाडाला तुझ्या बाजूने साक्ष देण्यास सांग. त्याची विनवणी करा पण साक्ष म्हणून झाड आणा. तरच तुला तुझे पैसे परत मिळू शकतात.
बिचारा रोशन निघून गेला. आता दुसऱ्या दिवशी दीनानाथ आणि बिरबल राजवाड्यातच रोशनची वाट पाहू लागले. थोडा वेळ गेल्यावर बिरबल म्हणाला, "आता रोशन आंब्याच्या झाडाजवळ पोहोचला असेल आणि त्याची विनवणी करत असेल." तेव्हा दीनानाथ म्हणाला, "रोशन हा म्हातारा माणूस आहे, तो इतक्या लवकर तिथे पोहोचू शकत नाही, त्याला खूप वेळ लागेल कारण तिथला रस्ताही चांगला नाही." बिरबल शांत पणे आणि रोशनची वाट पाहू लागला. बऱ्याच दिवसांनी रोशन राजवाड्यात आला आणि म्हणाला, महाराज मी झाडाला खूप विनंती केली पण ते त्याच जागेवर उभं राहिल आता मला सांगा मी काय करू? बिरबलने रोशनला धीर दिला आणि म्हणाला काळजी करू नकोस तुझ्या बाजूने साक्ष देऊन झाड निघून गेले आहे.
दीनानाथने आश्चर्यचकित होऊन विचारले झाड कधी आले? मी इतके दिवस इथे बसलो आहे.” बिरबल म्हणाला, “मी जेव्हा दीनानाथला विचारले की रोशन त्या झाडाजवळ पोहोचला असेल का, तेव्हा तो नाही म्हणाला. याचा अर्थ दीनानाथाला ती जागा चांगलीच माहीत होती पण तो खोटे बोलत होता.
आता दीनानाथला बिरबल म्हणाला की, आता तू पैशांबद्दल सांग की मी माझ्या पद्धतीने विचारु. आता दीनानाथने भीतीपोटी सर्व काही कबूल केले आणि त्याने रोशनची माफी मागितली आणि त्याचे सर्व पैसे परत केले.