गणपतीने वाहन म्हणून मूषकाची निवड का केली?

सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (11:41 IST)
गणपतीचे वाहन म्हणून मूषक प्रसिद्ध आहे. आता एवढासा मूषक त्याच्यावर महाकाय देहाचा लंबोदर गणपती स्वार कसे होतात आणि गणपतीला पाठीवर घेऊन मूषक धावतो तरी कसा, असा प्रश्न सर्वांना पडतो. मात्र, मूषक गणपतीचे वाहन कसे झाले, याबद्दल एक कथाही आढळून येते.
 
एकेकाळी, एक अतिशय भयंकर राक्षस राजा होता - गजमुख. त्याला खूप शक्तिशाली व्हायचे होते आणि धनाची लालसा देखील होती. त्याच वेळी, त्याला सर्व देवी -देवतांना वश करायचे होते, म्हणून त्याने भगवान शिवाकडून वरदानासाठी तप केले. शिवाकडून वरदान मिळवण्यासाठी त्याने आपले राज्य सोडून जंगलात राहण्यास सुरुवात केली आहार आणि पाणी न घेता रात्रंदिवस तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.
 
काही वर्षे निघून गेली, शिवाजी त्याच्या अफाट दृढतेने प्रभावित झाला आणि शिव त्याच्यासमोर प्रकट झाला. शिवजींनी प्रसन्न होऊन त्याला दैवी शक्ती दिली, ज्यामुळे तो खूप शक्तिशाली झाला. शिवाने त्याला दिलेली सर्वात मोठी ताकद म्हणजे तो कोणत्याही शस्त्राने मारला जाऊ शकत नाही. असुर गजमुखला त्याच्या शक्तींचा अभिमान वाटू लागला आणि त्याने आपल्या शक्तींचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आणि देवतांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.
 
मात्र त्याच्या दहशतीपासून फक्त शिव, विष्णू, ब्रह्मा आणि गणेश वाचलेले होते. गजमुखाला प्रत्येक देवतेने आपली उपासना करावी असं वाटतं असायचं. हे बघून सर्व देव शिव, विष्णू आणि ब्रह्माजींच्या आश्रयाला पोहोचले आणि त्यांच्या जीवाच्या रक्षणासाठी विनवणी करू लागले. हे सर्व पाहून शिवाने गणेशला राक्षस गजमुखला हे सर्व करण्यापासून रोखण्यासाठी पाठवले.
 
गणेश गजमुखाशी लढले आणि गजमुख या राक्षसाला वाईट रीतीने जखमी केले. पण तरीही त्याला ते मान्य नव्हते तेव्हा त्यांनी राक्षसाचं उंदीर या रुपात रूपांतर केले तेव्हा उंदरी गणेशावर हल्ला करण्यासाठी धावत असताना गणेजींनी उडी मारली आणि त्यांच्यावर बसले आणि गणेशजींनी गजमुखाला आजीवनासाठी मुषक बनवले आणि ते आयुष्यभर त्यांचे वाहन म्हणून ठेवले. नंतर गजमुखही या स्वरूपावर प्रसन्न झाले आणि गणेशाचा प्रिय मित्रही बनला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती