Panchatantra Story खट्याळ माकड

शुक्रवार, 2 जुलै 2021 (11:25 IST)
एकेकाळी जंगलात एक खोडकर माकड राहत होता. ते माकड झाडावरुन फळे फेकून सर्वांना जखमी करायचा. उन्हाळ्यात झाडांवर बरीच आंबे लागलेली होती. माकड सर्व झाडांच्या भोवती फिरायचा आणि आंब्याचा रस चोखायचा आणि खूप मजा करायचा.
 
तो वरून येणार्‍या आणि जाणार्‍या प्राण्यांवर आंबा फेकायचा आणि मजे घेयचा.
 
एकदा हत्ती जवळून जात होता. झाडावर बसलेला माकड आंबे खात होता आणि आपल्या खोडकर वृत्तीने लाचार होता.
 
माकडाने आंबे तोडून हत्तीला मारण्यास सुरुवात केली. एक आंबा हत्तीच्या कानात आदळला आणि एक आंबा डोळ्यावर आदळला. याचा हत्तीला राग आला. त्याने आपली सोंड उंचावली आणि रागाने माकडाला गुंडाळले आणि म्हणाला की मी आज तुला ठार मारीन, तू सर्वांना त्रास देतो. यावर माकडाने कान धरले व माफी मागितली.
 
माकड म्हणाला की आता मी कोणालाही त्रास देणार नाही आणि माझ्याकडून आता कधीही तक्रारीची वेळ येणार नाही.
 
माकडाने वारंवार माफी मागितल्यावर हत्तीला दया आली आणि त्याने माकडाला सोडून दिलं.
 
काही वेळानंतर दोघेही जवळचे मित्र झाले.
 
माकड आता त्याच्या मित्राला फळे तोडून खाऊ घालत असे आणि दोन्ही मित्र जंगलात फिरायचे.
 
नैतिक शिक्षण -
कोणालाही त्रास देऊ नये, त्याचा परिणाम वाईट होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती