अकबर बिरबल कथा- राजाचे स्वप्न

मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (20:16 IST)
एकदा बादशहा अकबर गाढ झोपेतून अचानक उठले आणि रात्र भर झोपू शकले नाही. ते खूप अस्वस्थ झाले होते, कारण त्यांनी एक विचित्र स्वप्न बघितले होते, त्याचा अर्थ त्यांना काही समजला नाही. त्यांनी स्वप्नात बघितले की त्यांचे एकानंतर एक सर्व दात पडत आहे आणि शेवटी फक्त एकच दात राहिला होता. ते या स्वप्नामुळे खूप काळजीत पडले आणि अस्वस्थ झाले.त्यांनी या स्वप्नाची चर्चा राज्यसभेत करण्याचा विचार केला 
 
दुसऱ्या दिवशी ते सभेत पोहोचले आणि त्यांनी आपल्या विश्वासू मंत्र्यांना पडलेले स्वप्न सांगून त्यांचे मत विचारले. सर्व मंत्र्यांनी उत्तर दिले की त्यांनी ह्या स्वप्नाबद्दल एखाद्या ज्योतिषाला विचारावं. तेच ह्यांचे अर्थ सांगू शकतील. बादशहाला देखील हे पटले. 
 
दुसऱ्या दिवशी त्यांनी काही विद्वान ज्योतिषांना बोलविले आणि स्वप्नाबद्दल सांगितले . त्या सर्व ज्योतिषांनी आपसात विचार केला आणि बादशहाला सांगितले -'' बादशहा आपल्या या स्वप्नाचा अर्थ आहे की आपले सर्व नातेवाईक आपल्या पूर्वीच मरण पावतील. ''
 
ज्योतिषांचे हे म्हणणे ऐकून बादशहा चिडले त्यांनी सर्व ज्योतिषांना तिथून निघून जायला सांगितले. नंतर त्यांनी बिरबलाला बोलविले आणि विचारले'' बिरबल आपण सांगा की आमच्या या स्वप्नाचा काय अर्थ आहे. ?''
 
बिरबल म्हणे,'' हुजूर माझ्यामते ह्या स्वप्ननाचा अर्थ असा आहे. की आपले वय सर्व नातेवाइकापेक्षा अधिक असणार आणि आपण त्या सर्वांपेक्षा अधिक जगणार. हे ऐकून बादशहा अकबर खूप खूश झाले.
 
तिथे असलेल्या सर्व मंत्री विचारात पडले की बिरबल ने देखील त्या सर्व ज्योतिष्यांच्या मताची पुनरावृत्ती केली आहे. एवढ्यात  बिरबल ने त्यांच्या शंकेचे समाधान केले ,' बघा मी देखील तेच सांगितले जे त्या सर्व विद्वान ज्योतिषांनी सांगितले होते, फक्त मी हे  वेगळ्या पद्धतीने सांगितले. आपली गोष्ट नेहमी योग्यरीत्या सांगितली पाहिजे. असं म्हणून बिरबल सभेतून निघून गेले.
 
तात्पर्य - कोणतीही गोष्ट सांगण्याची एक पद्धत असते. त्रासदायक गोष्ट जरी चांगल्या पद्धती ने सांगितली तर ती वाईट वाटत नाही म्हणून गोष्ट नेहमी योग्य पद्धतीने आणि रीतीने सांगितली पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती