आपडी थापडी.. गुळाची पापडी

गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (08:30 IST)
आपडी थापडी
 
गुळाची पापडी
 
धम्मक लाडू
 
तेल काढू !
 
तेलंगीचे एकच पान
 
दोन हाती धरले कान !
 
चाउ माउ चाउ माउ !
 
पितळीतले पाणी पिऊ
 
हंडा पाणी गडप !
 
गुळाची पापडी हडप !

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती