"गृहिणी" आहे हे सांगतांना अजिबात लाजायचं नाही

शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (17:02 IST)
"गृहिणी" आहे हे सांगतांना
अजिबात लाजायचं नाही
" घर सांभाळणं " हे काम
वाटतं तेवढं सोप्पं नाही
 
ती घर सांभाळते म्हणून
बाकीचे relax असतात
आपापल्या क्षेत्रामध्ये
उत्कृष्ट काम करू शकतात
 
घराघरातली प्रसन्न गृहिणी
पायाचा दगड असते
घराण्याची सुंदर इमारत
तिच्यामुळेच उभी असते
 
घर सांभाळणाऱ्या गृहिणीला
कधीही कमी लेखू नये
नौकरी करत नाही म्हणून
कोणीच तिला टोकू नये
 
तिच्या कष्टाचं मोल लावल्यास
पगार देऊ शकणार का ?
इतके काबाड कष्ट आपण
कधी करू शकणार का ?
 
नौकरी करणाऱ्या स्त्रियांचं
निश्चितच कौतुक आहे
पण समजू नका गृहिणी मध्ये
काहीतरी कमी आहे
 
खरं सांगा गृहिणी सारखी
कोणती व्यक्ती उदार असते
घरातल्या सर्वांसाठी
जी फुकटात राबत असते
 
दर महिन्याला पगार मिळतो
म्हणून आपण नौकरी करतो
चोवीस तास राबणाऱ्या
गृहिणीला काय देतो ?
 
गृहिणीला पॅकेज देण्याची
तुमची माझी श्रीमंती नाही
डॉक्टर , इंजिनियर , बँकर पेक्षा
तिचा हुद्दा कमी नाही
 
मानधन नाही , सुट्टी नाही
तरीही हसमुख असते " ती "
घराचं घरपण टिकून असतं
जोपर्यंत असते " ती "
 
गृहिणी आहे हे सांगतांना
मान खाली घालू नका
बाकीच्यांनी तिच्या समोर
मुळीच चरचर बोलू नका
 
म्हणून म्हणतो गृहिणीचा
आदर आपण केला पाहिजे
अन्नपूर्णा , लक्ष्मीला
पहिला मान दिला पाहिजे
 
- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती