आयुष्याची घोडदौड सुरूच राहते,
काहीही घडो, ती मात्र चालूच असते,
कुणीही थांबायला नसतंच तयार,
काहीही होवो जो तो हवेवर स्वार,
शारीरिक तक्रार असली ,काळजी कुणाला,
जुजबी औषध घेतलं,तयार जुंपयला,
घड्याळा च्या काट्यावर सारेच पळतात,
सणवार पण त्यातच पार पाडतात,
थांबला तो संपला ,हेच ठाऊक त्यांना ,
हाच काळ सुरू आहे, लागू हेच सर्वांना!
पैसे कमवायचे आहे, स्वप्न पूर्ण करायचंय,
ओझ्याच्या बैला सारख, आपल्याला जुंपयचय,
समाधान मानायला कुणीही न तयार,
हेच आहे सध्याच्या जीवनाच सार!!
..अश्विनी थत्ते