कधी कधी ना एखादा दिवसच कसा अगदी सर्वसामान्य निघतो..... म्हणजे उठायला पाच दहा नाही चांगला पंधरा मिनिट उशिर होणे....... ऊठल्या नंतरही मग हे आधि करू की ते करू यात अजून पंधरा मिनिटं जाणे.......... भाजी चिरून ठेवलेली नसणे........ पोळीवाली पोळ्या केल्यानंतर ओटा तसाच ठेवून निघुन जाणे.............. कस तरी सगळ सावरून अंघोळीसाठी गेल कि साबणाचा अगदी तुकडाही नसणे............ चहासोबत बिस्कीट खायची ताीव्र इच्छा झालेली असताना डब्यात फक्त रॅपर सापडणे..... अशा छोटय़ा छोटय़ा कटकटीतुन सुरू झालेला दिवस..... आॅफिस मधुन आल्यावर लाॅक उघडुन बघितल्यावर भांड्यांचा ढिगारा तसाच दिसणे.... फरशी पुसलेली नसणे.... कपडे वाळत टाकलेले नसणे... म्हणजे कामवालीने सुट्टी मारलेली असणे.... इथ पर्यंत येवून पोचतो..... एव्हाना संध्याकाळचे पाच वाजलेले असतात.....