मजेदार विनोद: न्हावी एजंट तर नाही ना...

गुरूवार, 10 एप्रिल 2025 (12:08 IST)
केस कापताना न्हावी मंत्र्याला विचारतो – "साहेब, हे स्विस बँकेचं प्रकरण काय आहे?"
मंत्री ओरडतो – "तू माझे केस कापतोयस की चौकशी करतोयस?"
न्हावी – "सॉरी साहेब, मी फक्त विचारलं."
दुसऱ्या दिवशी, मोठ्या मंत्र्याचे केस कापताना न्हावी विचारतो – "साहेब, हे काळ्या पैशाचं प्रकरण काय आहे?"
मंत्री चिडून म्हणतो – "हे तुला कोणी विचारायला सांगितलं?"
न्हावी – "सॉरी साहेब, सहज विचारलं."
तिसऱ्या दिवशी, सी.बी.आय. ने न्हाव्याला चौकशीसाठी बोलावलं.
सी.बी.आय. अधिकारी – "तू पाकिस्तानचा एजंट आहेस का?"
न्हावी – "नाही साहेब."
सी.बी.आय. – "तू कोणत्याही विरोधी पक्षाचा एजंट आहेस का?"
न्हावी – "नाही साहेब."
सी.बी.आय. – "तू देशद्रोही आहेस का?"
न्हावी – "देवाची शपथ, नाही साहेब. मी एक साधा, गरीब न्हावी आहे."
सी.बी.आय. – "मग केस कापताना तू VIP लोकांना स्विस बँक आणि काळ्या पैशांबद्दल का विचारतोस?"
न्हावी –”साहेब, मलाही माहिती नाही. पण जेव्हा मी त्यांना स्विस बँक किंवा काळ्या पैशांबद्दल विचारतो, तेव्हा त्यांचे केस सरळ उभे राहतात. त्यामुळे मला केस कापायला सोपं जातं. म्हणून मी नेहमी विचारतो!"
ALSO READ: Teacher and Student Jokes :काय विचार करतोय

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती