विरंगुळा : Marathi Funny Jokes

शनिवार, 29 मे 2021 (15:51 IST)
आजचं तापमान 38 डिग्री अचानक वाढल.
लस घ्यावी
की लस्सी, हेच कळत नाही
Otherwise beer is always preferred
 
 
पक्का पुणेरी-
काल कोरोना  टेस्ट करायला  गेलो. डॉक्टर म्हणाले  ₹ ४५००, होतील...*
मी डॉक्टरांच्या जवळ जाऊन तोंडाजवळ शिंकलो  आणि निघून आलो.
आता डॉक्टर स्वतःची टेस्ट  करतील*, 
डॉक्टर निगेटिव तर मी पण निगेटिव.
 
 
Home Isolation... चे दोन महत्वाचे नियम लक्षात ठेवा 
१) करोनाशी लढायचं आहे, 
पण घाबरायचं नाही. 
 
२) बायकोला घाबरायचं आहे, 
पण लढायचं नाही..!
 
डॉक्टर :-  कुठं दुखतंय..? ....
पेशंट* : फी कमी
करणार असाल तर सांगतो. ... 
नाहीतर शोधा  
 
पुण्यात हल्ली खूप चहाची दुकाने निघालीत.......
:
येवले चहा......
:
सायबा चहा......
:
कडक चहा...... 
 
 
हा......
:
हरमन चहा......
:
मायेचा चहा.......
:
प्रेमाचा चहा.....
:
मी एका पुणेकराला सहज प्रश्न विचारला.......
:
सगळ्यात कोणता चहा चांगला ? ? ?
:
तर तो म्हणाला......
:
फुकटचा चहा...... 
 
भावाचा ब्रो झाला.
बहिणीची सिस झाली.
पप्पाचा पाॅप झाला.
मम्मीची माॅम झाली. 
पण अजून कुणाची हिंमत झाली नाही,
बायको या शब्दाची छेडछाड करुन बोका बोलायची.यालाचं दहशत म्हणतात..
 
नवरा : मला आज पर्यंत समजलेले नाही की, टी व्ही वर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम बघून सुद्धा घरी खिचडीच का होते ???? 
बायको : हेल्दी आहे ते...
सगळे जसे किंगफिशरचे कँलेडर बघून घरात कालनिर्णयच लावतात ना...
आगदी तस्सेच असते हे सुद्धा..
 
एक देशस्थ जाम वैतागला होता. त्याला विचारलं काय झालं तर म्हणतो ह्या कोकणस्थ लोकांचं एक काही धड नसतं 
रानडे कर्वे रोडवर राहतात 
कर्वे फडके रस्त्यावर राहतात 
फडके लेले आळीत राहतात 
लेले सेनापती बापट रस्त्यावर राहतात 
बापट दांडेकर पुलाजवळ राहतात 
दांडेकर गोखले नगरला राहतात 
गोखले भांडारकर रोड वर राहतात 
आणि भांडारकर रानडे रस्त्यावर राहतात 
अरे आपापल्या गल्लीत रहा ना कुणीतरी
 
You can't outsmart a Punekar:-
मुंबईकर: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो 
पुणेकर: दिड दिवस !!! 
मुंबईकर:किती हा चिकटपणा ?? 
पुणेकर: तुमच्याकडे किती दिवस बसतो ??? 
मुंबईकर : दहा दिवस 
पुणेकर :  गणपती कशाची देवता आहे ?? 
मुंबईकर : बुद्धीची !!! 
पुणेकर : मग बरोबर आहे.....आम्हाला दिड दिवस पुरतो. 
 
दुकानदार - बोला साहेब, काय देऊ?
ग्राहक - होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी केक द्या.
दुकानदार - बांधून देऊ की इथेच खाणार? 
 
मुंबईत समुद्राजवळ रहाणाऱ्यांनी कृपया धोतर व टोपी घालू नये. 
वादळ घुसलं तर पॅराशुट होईल!
 
जोशी : माझी बायको फार रागीट आहे.
छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते. 
कुलकर्णी : माझी बायको पण फार 
रागीट होती, 
पण आता शांत झालीय... 
जोशी : कसे काय ? काय केलं तू ? 
कुलकर्णी: काही नाही. मी एकदा म्हटलं...
म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड 
करतातच. 
*तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली
 
पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी 
अतिथि देवो भव 
परंतु देवांना नम्र विनंती आहे की 
त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेर पार्क करावी...
 
मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय 
पुणेरी वडील* - मग आता काय पेन्शन मागायला आलायस ?? 
 
मध्यमवयीन पत्नीस डॉक्टर जोशी सकाळी दवाखान्यात जाण्यापूर्वी म्हणाले "आता तुझ्यात पहिल्या सारखा चार्म राहिला नाही" 
डॉक्टरांनी दुपारी घरी फोन केला, तर कुणी फोनच उचलला नाही. घरी आल्यावर डॉक्टर आपल्या पत्नीस म्हणाले .... 
दुपारी फोन करीत होतो... फोन का उचलला नाहीस..?
"हो, नाही उचलला...... सकाळी तुम्ही म्हणालात ना माझ्यात काही चार्म राहिला नाही... म्हणून डॉक्टर गोडबोलेंना घरी बोलावले होते...... !
2nd ओपिनीयन घेण्यासाठी....
 
भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना
पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हो आहे ना साहेब
पुणेकर : आधी ते खर्च कर
 
स्थळ :- सदाशिव पेठ
गिऱ्हाईक : 
“हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?” 
दुकानदार :-
“वीस रुपयापासून पाच हजार रुपये पर्यंत आहेत.” 
गिऱ्हाईक :-
“वीस रुपयांचे बघू.” 
दुकानदार  :-
“हे घ्या...
कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा...." 
गिऱ्हाईक :-
“हे कसं काम करतं?” 
दुकानदार  :-
“काहीच काम करत नाही. 
पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्याने बोलायला लागतात...... 
पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं,
हेच एकमेव यंत्र आहे."
 
अलक प्रमाणेच एक छोटा विनोद... 
बायको :- मी दोन तासासाठी बाहेर जात आहे... तुम्हाला काय हवय..? 
नवरा :- मला तेच हवय...
 
कधी विचार केला
M सरळ आणि
W उलटे का लिहितो?
कारण Men सरळ आणि
Women उलटा विचार करतात
काल ही थेट कथा माझ्यासोबत घडली ……
काल मी लिफ्टने वर जात होतो,
त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .. !!
मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले:
"दुसरा की तिसरा"?
बाईंनी रागाने म्हटले 
"आत्या आहे मी याची"
 
चाळिशीचा फार त्रास होतो ...नको नकोसं होतं नुसतं..काय करावे कळत नाही, सुधरत नाही ... 
तिशीत होत तेंव्हा कस बरं होत, उत्साह होता, कुठेही आणि कधीही जाऊ शकत होतो... 
विशीत असताना तर अजून छान, कितीही फिरलं, खेळलं तरी दमायला पण होत नव्हतं ... 
पण आता...
नको नकोस झालं आहे ... 
४५ च्या आसपास काय होणार काय माहिती? पन्नाशी नंतर तर बोलूच नका। 
नाही नाही, 
माझ्या वयाबद्दल नाही बोलत..
तापमानाबद्दल बोलत आहे..  तापमान कस तिशीत किंवा विशीत असलेलंच  चांगलं...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती