धन्य ते पुणेकर!!!

शनिवार, 4 मे 2024 (16:30 IST)
एका पुणेकराने बंगल्याबाहेर एक पाटी लावली. 
"वस्त्रपात्रप्रक्षालिका पाहिजे"
जो तो ती पाटी वाचून विचारात पडायला लागला. की बुवा याचा नेमका अर्थ काय? 
आता विचारायचे तरी कुणाला?
 
दुसर्‍याच दिवशी एका 'जाणकार' चाणाक्ष पुणेकराने त्या बंगल्याबाहेर शेजारीच एक टेबल मांडले, आणि त्यावर एक पाटी लावली.
 
"शेजारी लिहिलेल्या पाटीवरील मजकूराचा अर्थ पाहिजे असल्यास खालील क्रमांकावर १० रुपयांचे डिजीटल पेमेंट करावे, मेसेज द्वारे उत्तर मिळेल.
"ज्यांनी ज्यांनी पेमेंट केले, त्यांना त्यांना मेसेज मिळत राहिला,
"धुणे-भांडी करायला बाई पाहिजे"

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती