दिवाळीसाठी कडक पुणेरी सूचना

कृपया दिवाळीच्या शुभेच्छा कमीत कमी शब्दात द्याव्यात.
उगीच लांबड लावू नये
 
ऊगाच Greeting Cards पाठवण्यापेक्षा भेट वस्तू पाठवाव्या. ऐपत नसेल तर मोती साबण पाठवला तरी चालेल. दिवाळी नंतर ही वापरता येतो.
 
अलंकारिक भाषा वापरून आमचा वेळ घालवू नये.
सरळ मुद्यावर यावे.
 
फटाके न उडविण्याविषयी आमचे प्रबोधन करू नये.आम्ही ते रस्त्यावरच ऊडवणार.
 
दिवाळीच्या दिवसांचे महत्च सांगणारे पोस्ट टाकू नये.
आम्हाला माहीत आहे.
 
ऊगाच ईटरनेट वरून डाऊनलोड केलेले रांगोळीचे फोटो स्वत: काढलेल्या रांगोळीचे म्हणून टाकू नये. आम्ही पण ईंटरनेट वापरतो.
 
सण साजरा न करता दान धर्माचे आवाहन करू नका.
आम्ही तो वेगळा करतो.
 
फराळास बोलवायचेच असल्यास आगाऊ सूचना द्यावी. फराळास स्वत: केलेलेच पदार्थ द्यावे. दुसरीकडून आलेले न आवडलेले प्रकार खपवू नये.
 
मागील वर्षीच्या त्याच त्याच पोस्ट परत चालणार नाहीत.... 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती