मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी प्रत्येक स्त्रीच्या जीवनासाठी आणि शरीरासाठी महत्त्वाची असते. दर महिन्याला महिलांना मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दरम्यान, स्त्रियांना मूड बदलणे, पेटके येणे आणि चिडचिड यासारख्या विविध शारीरिक आणि मानसिक समस्या देखील येतात. मासिक पाळी आवश्यक आहे परंतु दर महिन्याला होणारी ही शारीरिक प्रक्रिया जेव्हा एखाद्या स्त्रीला एखाद्या विशेष कार्यक्रम किंवा समारंभात भाग घ्यायचे असल्यास समस्या निर्माण होते. आजही भारतातील अनेक घरांमध्ये मासिक पाळीच्या वेळी पूजेला जात नाही.
अशा परिस्थितीत महिलांना चुकीच्या वेळी मासिक पाळी आल्यास समस्या उद्भवू शकतात.ही समस्या टाळण्यासाठी स्त्रिया मासिक पाळी काही दिवस पुढे ढकलू शकतात. मासिक पाळी काही दिवस पुढे ढकलण्यासाठी महिला औषधे वापरतात. परंतु मासिक पाळी पुढे ढकलणारी औषधे कधीकधी वाईट परिणाम देतात. त्यांच्या सेवनाने हार्मोन असंतुलन होण्याचा धोका वाढतो. असं होऊ नये या साठी काही घरगुती उपाय अवलंबवून या समस्याला टाळू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
पीरियड्स टाळण्यासाठी टिप्स
1 मसालेदार अन्न-
अनेकदा मासिक पाळी दरम्यान, किशोरवयीन मुलींना लाल तिखट, तेलकट आणि मसालेदार अन्न टाळण्याचा सल्ला दिला जातो. मासिक पाळी काही दिवस पुढे ढकलायची असेल तर मिरची, काळी मिरी, लसूण यासारख्या पदार्थांचे सेवन करू नका. मसालेदार अन्न रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे मासिक पाळी येण्याची शक्यता वाढते. तज्ञांच्या मते, मसालेदार अन्न शरीराला उष्ण करते आणि रक्त प्रवाह गतिमान करते. त्यामुळे मासिक पाळी येण्यापूर्वी त्याचे सेवन कमी करा जेणेकरून मासिक पाळी काही दिवस पुढे ढकलली जाऊ शकते.
2 लिंबू-
लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करतात. मासिक पाळी टाळण्यासाठी लिंबू सेवन करू शकता. लिंबू रक्तप्रवाह नियंत्रित करण्यास किंवा बंद करण्यास मदत करते. लिंबू मासिक पाळीशी संबंधित समस्या देखील कमी करू शकतो. यासाठी दोन ते तीन चमचे लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून प्या. मासिक पाळीला काही दिवस उशीर होऊ शकतो.
4 ओवा -
या मध्ये अनेक पोषक आणि व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आढळतात. मासिक पाळी काही दिवस पुढे ढकलण्यासाठी ओव्याची पाने पाण्यात उकळून थंड झाल्यावर दिवसातून दोनदा प्या. हे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास देखील मदत करते आणि मासिक पाळी लांबवू शकते.