Healthy lauki भोपळा ही अनेकांची नावडती भाजी, भरीत, कोशिंबिर, सूप असे पदार्थ भोपळ्यपासून बनवले जातात. कितीही नावडता असला तरी गुणधर्मामुळे थोड्या प्रमाणात का होईना, परंतु प्रत्येकाने भोपळा खायलाच हवा. चेहर्यावर पडणार्या सुरकुत्यांपासून पोटाच्या गंभीर विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. भोपळ्याच्या अशाच काही औषधी गुणधर्माबाबत जाणून घेऊ.
बहुसंख्य महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळते. अशा महिलांनी भोपळ्याच्य बियांचं सेवन करावं. भोपळ्याच्या बियांमध्ये लोह, झिंक, पोटेशियम आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण भरपूर असल्यानं बरेच लाभ होतात.