25-70 वयोगटातील व्यक्तींमध्ये सर्रासपणे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या वाढत असल्याचे दिसून येते. दुर्लक्ष केल्यामुळे किंवा जागरूकतेच्या अभावामुळे अनेकांना जीव गमावत आहेत. दैनंदिन जीवनातील अनेक घटक हृदयाच्या समस्यांचा धोका वाढवू शकतात.त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतली आणि वेळीच प्रतिबंध केल्यास ऱ्हदयविकाराच्या समस्या टाळता येऊ शकतात.
चूकीची जीवनशैली निवडणे हे भारतीयांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगास कारणीभूत ठरते. चूकीचा आहार, वाढता ताणतणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपानासारख्या वाईट सवयींमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त अनुवांशिकता, वैद्यकिय इतिहास आणि जन्मतः वजन कमी असणे हे देखील हृदयाच्या समस्यांना कारणीभूत ठरते. यामुळे हृदयविकाराचा झटका येणे आणि हृदयविकाराच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. एखाद्याच्या आहारामध्ये कर्बोदकांचा प्रमाण अधिक असणे, ज्यामुळे ओटीपोटात जास्त चरबी जमा होते आणि ते हृदयाच्या आरोग्यासाठी चिंतेची बाब ठरु शकते. ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्ती हृदयाच्या समस्यांना कारणीभूत ठरतात. आहाराचा विचार करताना, आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास धोका असतो. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन हे उच्च रक्तदाबामागचे मुख्य कारणे आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. कामाच्या व्यापामुळे तरुणांमध्ये तणावाचे प्रमाण वाढते आहे, शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी झाले आहे, परिणामी एकूण फिटनेस पातळी कमी झाली आहे.
तुमच्या हृदयाच्या आरोग्याचे रक्षण कसे कराल
एखाद्याचे वय काहीही असो, हृदयविकाराची समस्या उद्भविण्या केवळ वय कारणीभूत नसते. जीवनशैली निवडी, आहाराच्या सवयी, व्यायाम पद्धती आणि तणाव व्यवस्थापन तंत्र यासारखे विविध घटक एखाद्याचा आरोग्यावर लक्षणीय परिणाम करतात. तुमच्या हृदयाच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही नियमित हृदय तपासणीसाठी करणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब, उच्च रक्त शर्करा पातळी किंवा उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी त्यासंबंधीत औषधं वगळू नका. नियमित आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात रहा. तुमच्या हृदयावर ताण येणारी कोणतीही कठोर परिश्रम करणे टाळा. दम लागणे, जास्त घाम येणे किंवा छातीत दुखणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या हृदयाचे आरोग्य हे तुमचे प्रथम प्राधान्य असले पाहिजे.