लसूण: लसूण मसालेदार पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलं तरी यात खूप औषधी गुणदेखील आहेत. लसुणामध्ये न्यूट्रिएंट्स, मिनरल्स, व्हिटॉमिन आणि अँटी-ऑक्सीडेंट आढळतं. लसूण अँटी-व्हायल सारखे काम करतं.
शेवग्याचा शेंगा. डेंग्यू आणि चिकनगुनिया मध्ये शेवग्याच्या शेंगांचा सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. शेंगांसोबतच शेवग्याचे पानेदेखील फायदेशीर असतात. या शेंगा व्हिटॉमिन ए चा सर्वोत्तम स्रोत आहेत. याव्यतिरिक्त व्हिटॉमिन बी6 आणि बी1 प्राप्त करण्याचा उत्तम स्रोत आहे. याने शरीराला ताकद मिळते आणि स्नायू मजबूत होतात.