Home Remedies : घरचा वैद्य

श्वासोच्छवासाच्या विकाराने बेजार झालेल्या व्यक्तीने रोज मिरे वाटून ते मधाबरोबर चाखल्यास लाभदाक ठरते. सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत असेल तर मिर्‍याची पूड दुधामध्ये उकळून ते दूध प्यावे.
 
गाजराची पाने दोन्ही बाजूंनी तूप लावून आचेवर गरम करून त्यांचा रस काढून 2-3 थेंब कानात व नाकात टाकावा. यामुळे अर्धशिशी नाहीशी होते.
 
मूळव्याध असणार्‍यांना मुळ्याची पाने अथवा रस दिल्याने फायदा होतो. मुळ्यांच्या कंदापेक्षा त्याच्या पानाच्या रसात अधिक गुणधर्म  आढळतात. मुळ्याची पाने पचनास हलकी, रूची निर्माण करणारी आणि गरम आहेत.
 
कारले खाल्ल्यामुळे त्वचा स्वच्छ होते. त्वचेतील हानिकारक घटक दूर होतात. त्यामुळे तारुण्पीटिका व त्वचेवरील पुटकुळंची समस्या दूर होते. कुठल्याही प्रकारची मुरुमे किंवा पुटकुळ्या होत नाहीत.
 
विंचू किंवा मधमाशा किंवा विषारी किडा चावल्यास त्यावर कांद्याचे पाणी लावावे. कांद्याला वाटून तो पाणत मिसळून घरात शिंपडल्यास किडे, पिसवा व मुंग्या जातात.

वेबदुनिया वर वाचा