औषध न घेता अशी करा डोकेदुखी दूर, जाणून घ्या 5 उपाय
मंगळवार, 16 एप्रिल 2024 (14:23 IST)
Headache Home Remedies : डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. तसेच अनेक कारणांमुळे लोकांच्या डोक्यामध्ये वेदना होतात म्हणजे डोके दुखते. डोकेदुखी साधारण असून शकते तशीच ती गंभीर देखील असू शकते. डोकेदुखीमुळे आपले रूटीन प्रभावित होते. तसेच काम आणि अभ्यासात लक्ष लागणे कठीण होते.
डोके दुखणे थांबावे म्हणून अनेक लोक औषधी घेतात. सारखे औषध घेणे शरीरासाठी घातक ठरू शकते. तसेच टॅबलेट्स या काही वेळच परिणाम करतात. अश्यावेळेस तुम्ही घरगुती उपाय करून डोकेदुखी थांबवू शकतात तर चला जाणून घेऊया कोणते आहे उपाय
1. एक्यूप्रेशरचा उपयोग करा- एक्यूप्रेशर एक्यूपंक्चरचे एक रूप आहे, ज्यामध्ये शरीरातील काही पॉइंटवर दबाव टाकला जातो. डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी आपण आपले हात, पाय किंवा डोक्यावरील काही पॉइंटवर दबाव टाकू शकतात. डोकेदुखी होत असेल तेव्हा दोन्ही हात समोर आणावे. आता एका हाताने दुसऱ्या हाताच्या अंगठा आणि इंडेक्स फिंगरच्या मधल्या जागेवर हलक्या हातांनी मसाज करा. ही प्रोसेस दोन्ही हातांनी 4 ते 5 मिनिट करावी असे केल्याने तुम्हाला डोकेदुखीपासून अराम मिळेल.
2. सफरचंदावर मीठ टाकून खा- वारंवार डोकेदुखी होत असेल तर सफरचंद वर मीठ टाकून सेवन करावे. डोकेदुखीपासून अराम मिळण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण भरून निघेल व डोकेदुखी लवकर बरी होईल.
3. गरमपण्यात लिंबाचा रस टाकणे- डोकेदुखीपासून लवकर अराम मिळण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस टाकावा. व तो सेवन करावा. यामुळे पोटातली एसिडिटी कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होईल.
4. लवंगाचे तेल- डोके दुखीपासून अराम मिळण्यासाठी लवंगाचे तेल फायदेशीर असते. डोके दुखत असेल तर लवंगाच्या तेलाने मॉलिश करावी. असे केल्याने तुमचे स्नायू रिलॅक्स होतील. स्ट्रेस कमी होईल आणि तुमच्या डोळ्यांना अराम मिळेल. लवंगाच्या तेलात पोषकतत्वे असतात. जे तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर असतात.
5. आले आणि तुळशीचा रस- आले आणि तुळशीचा उपयोग डोकेदुखी थांबण्यासाठी फायदेशीर आहे. याकरिता तुळशीचे पाने व आल्याचा रस काढून एकत्रित मिक्स करा. मग हा रस कपाळावर चांगल्या प्रकारे लावावा. तसेच तुळशीचे पाने व आले पाण्यात उकळवून ते सेवन करू शकतात. असे केल्याने डोकेदुखीला आराम मिळेल. डोकेदुखी एक सामान्य समस्या आहे. पण काही घरगुती ऊपाय करून यापासून अराम मिळू शकतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.