disadvantages of radish मुळ्याचे 5 तोटे जाणून तुम्हाला धक्का बसेल

शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (16:10 IST)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री कधीही मुळा खाऊ नये. याचे सेवन नेहमी दिवसा करावे. जर तुम्ही मुळा खाण्याचे शौकीन असाल आणि रात्रीच्या वेळी मुळा पराठा खात असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठता, पोटदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे,सकाळच्या जेवणात मुळा खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
 
चला जाणून घेऊया मुळा खाण्याचे 5 तोटे-
 
1. ज्यांना कमी रक्तदाब आहे त्यांनी नेहमी जास्त मुळा खाणे टाळावे, कारण तुमचा रक्तदाब कमी झाल्यामुळे मुळ्याचे जास्त सेवन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरेल.
 
2. मुळा मध्ये आढळणारे गोइट्रोजन नावाचे संयुग तुमच्या थायरॉईड ग्रंथीला नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे थायरॉईडच्या रुग्णांनी कच्च्या मुळ्याचे सेवन करू नये. कारण ते थायरॉईड संप्रेरकांमध्ये व्यत्यय आणू शकते आणि त्यांना हानी पोहोचवू शकते. म्हणूनच तुम्ही शिजवलेल्या मुळ्याचे सेवन करू शकता.
 
 3. रात्रीच्या जेवणात मुळ्याचे सेवन टाळावे, कारण त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीरातील वेदना वाढू शकतात. जर तुम्हाला मुळा सॅलड म्हणून खायचा असेल तर त्यात इतर भाज्या मिसळून सेवन केल्यास फायदा होईल.
 
4. जर तुम्ही सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्ही मुळा कमी प्रमाणात सेवन करा. तसेच गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात मुळा खाणे टाळावे.
 
5. तुमची रक्तातील साखर कमी झाली तरीही तुम्ही मुळा जास्त प्रमाणात सेवन करू नये, यामुळे हायपोग्लायसेमिया होऊ शकतो.
Edited by : Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती