अननस हे फळ कापण्यास जितके अवघड तितकेच ते चविष्टही लागते. अननस वरून कडक पण आतून आंबट गोड लागते. हे फळ खूप आरोग्यदायी असते. त्यात ए, सी, जीवनसत्त्व, पोटॅशिअम, तंतुमय पदार्थ, अँटीऑक्सिडंट, फॉस्फरस असते त्यामुळे हाडे मजबूत होतात शिवाय वजन कमी होण्यासही मदत मिळते. अननन खाल्ल्यास अनेक आजारांत आराम मिळतो. त्यामुळे अननसाचे फायदे जाणून घेऊया.
किडनी स्टोन : एखाद्या व्यक्तीला मूतखडा असेल तर तिने अननसाचे सेवन करणे लाभदायी ठरते. त्याशिवाय काही लोकांमध्येमूतखडा होत नाही, पण मूत्रपिंडामध्ये मधून मधून वेदना होतात. त्यांच्यासाठीही अननसाचा खूप फायदा होतो. अननस कापून खाणे हे कंटाळवाणे वाटत असेल तर अननसाचा रसही पिता येतो.
आर्थ्रायटिस : अननसामध्ये भरपूर प्रमाणात मँगेनीज असते त्यामुळे हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर रोज अननसाचे सेवन केल्यास स्नायू आणि सांध्यांमध्ये होणारी जळजळ कमी होते. आर्थ्रायटिसच्या विकारातही आराम मिळतो. वातावरण बदलामुळेही अनेकांना या समस्या भेडसावतात. त्यांच्यासाठी अननसाचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते.
* अननसात असणारे ब्रोमिलेन सर्दी आणि खोकला, घशाला येणारी सूज, घशाची खवखव आणि सांधेदुखीमध्ये फायदेशीर असते. पचनासाठीही ते उपयु्रत असते. अननसाच्या रसात मुलेठी, बेहडा आणि खडीसाखर मिसळून सेवन केल्यास खोकला आणि दम यामध्ये फायदा होतो.
* अननस एकप्रकारे नैसर्गिक औषधी आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या शरीरावर सूज असते त्यांनी रोजच अननसाच्या दोन-तीन तुकड्यांचे सेवन केले पाहिजे. ज्या लोकांना मूतखड्याचा किंवा किडनी स्टोनच्या वेदना होत असतील, त्यांनी रोजच एक ग्लास अननसाचा रस सेवन करावा.