जाणून घ्या बर्फाचे हे ही फायदे...

शुक्रवार, 24 मे 2019 (10:46 IST)
उन्हाळ्यात बर्फ नाव घेतलं तरी थंड वाटू लागतं परंतू गार रसदार बर्फाचे अनेक फायदे आहे जे बहुतेकच माहीत असतील... जाणून घ्या हे फायदे..
 
कडू औषध खाण्यापूर्वी तोंडात बर्फ ठेवून घ्या. औषध कडू लागणार नाही.
उलट्या बंद होत नसतील तर बर्फ चोखावा.
शरीरातील कोणत्याही भागातून रक्त येणं थांबत नसेल तर त्यावर बर्फ लावण्याने रक्त येणे लगेच थांबतं.
फास टोचल्यावर बर्फ लावून तो भाग संवेदनाशून्य करावा ज्याने फास सोप्यारित्या बाहेर येते.
पायाच्या टाचांमध्ये वेदना होत असतील तर बर्फ चोळल्याने आराम मिळेल.
अती आहारामुळे अपचन होत असल्यास जेवण लवकर पचण्यात मदत मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती