ही लक्षणे गंभीर रोगांना दर्शवतात

बुधवार, 21 जुलै 2021 (15:15 IST)
आजच्या धावपळीच्या युगात लोक इतके पुढे गेले आहे की ते आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. परंतु आपले शरीर आपल्याला काही संकेत देतात. तसेच पायात होणारे काही बदल देखील आजारांना सूचित करते.दुर्लक्षित केल्यावर हे आजार गंभीर देखील होऊ शकतात. चला तर मग त्या लक्षणां बद्दल जाणून घेऊ या. जी गंभीर रोगांना दर्शवतात.
 
* नखे पिवळसर होणे-
बऱ्याच वेळा नखांची काळजी घेतल्यावर देखील ते पिवळे दिसतात. बऱ्याच लोकांची नखे जाडसर होऊन खाली दुमडतात. बऱ्याच वेळा जास्त नेलपेंट लावल्यावर असे होणे शक्य आहे. परंतु जर नखांचा रंग गडद पिवळा आहे तर हे संसर्गाला दर्शवतात. अशा परिस्थितीत दुर्लक्षित करू नका. हे त्वचेच्या कर्करोगाचे संकेत असू शकतात.
 
* पायात वेदना होणे-
पायात सतत दुखणे असेल तर शरीरात व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, पोटॅशियमची कमतरता असू शकते.या व्यतिरिक्त ह्याचे एक कारण संधिवाताची समस्या देखी असू शकते. अशा परिस्थितीत हाडांना बळकट करण्यासाठी आहारात ताजे फळे, भाज्या डेअरी उत्पाद, डाळी,सुकेमेवे, दलिया समाविष्ट करावे.
 
* टाचा फाटणे किंवा टाचांमध्ये वेदना होणं-
टाचा सुन्न होणं आणि त्यामध्ये वेदना होणे जाणवल्यास शरीरात ग्लुकोज ची पातळी वाढल्यामुळे मधुमेह असल्याचे कारण असू शकते. या परिस्थितीत दुर्लक्षित ना करता त्वरितच डॉक्टरांशी संपर्क करावा.
 
* पायावर सूज येणं-
शरीरात रक्ताची कमतरता आणि किडनी संबंधित
त्रासामुळे पायात सूज येते अशा परिस्थितीत आपल्या दररोजच्या आहारामध्ये पोषक घटक असलेल्या समृद्ध वस्तूंचे सेवन करावे. तसेच त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
* तळपाय थंड होणं-
तळपाय थंड होणं हे रेनॉड रोगाचे संकेत आहे. या आजाराच्या प्रभाव रक्त परिसंचरणावर होतो. जर आपले देखील तळपाय थंड होतात तर डॉक्टरांशी संपर्क करावे.
 
* कुरूप होणं -
फुटकॉर्न किंवा कुरूप ही गाठी सारखे असते. ही जास्त करून घट्ट शूज वापरल्याने होते. तज्ज्ञ सांगतात की हे संधिवात किंवा दुखापतीमुळे होऊ शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती