आरोग्याची काळजी घेणे अत्यन्त महत्वाचे असते मग ते घरातील वयोवृद्धांची असो, स्वतःची असो, किंवा लहान मुलांची. मुलं खाण्यासाठी फार त्रास देतं असतात. त्यांना त्यांचा आवडीचे पदार्थ मिळाले नाही तर ते फार उच्छाद मांडतात, धिंगाणा घालतात. जेवतच नाही आणि हट्टी होतात. अश्याने त्यांची प्रकृती खालवत जाते. पण काही वेळेस मुलांच्या वागणुकीमध्ये काहीसा बदल दिसल्यास काही काळजीचे तर नाही न ह्याचा कडे लक्ष देणे गरजेचे असते.
हीमोग्लोबीनची कमी असल्यास त्यांचा आहारामध्ये आयरन, खनिज, व्हिटॅमिन, प्रथिनं, कार्बोजयुक्त पदार्थांचा समावेश असावा. खजूर, बीटमध्ये भरपूर मात्रात आयरन आढळतं. तेव्हा आपल्या मुलांचा आहारात पौष्टिक तत्वांचा समावेश करावा आणि वेळोवेळी डॉक्टरांचा परामर्श घ्यावा.