चिरतारुण्य ‍टिकवण्यासाठी काही सोपे उपाय

शनिवार, 18 एप्रिल 2020 (12:57 IST)
आपल्या शरीरावर जर का कुठल्या गोष्टीचा परिणाम पडतो तो असतो कामाचा आणि कामाच्या व्यापामुळे होणाऱ्या ताणाचा. अत्यधिक ताणामुळे आरोग्य बिघडते आणि शरीरावर त्याचा परिणाम पडतो आणि शरीर अनेक रोगाने ग्रसित होते. कमी वयातच अनेक रोग झाल्याने शरीराचा बिघाडतर होतोच त्याशिवाय सुंदरता ही जाते. आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर हे उपाय करा आणि निरोगी राहा. त्याचबरोबर चीर तारुण्य राहा.
 
* व्हिटॅमिन डी घेणे - व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं आणि व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्याच्या किरणांपासून मिळते. जमल्यास सकाळी कोवळ्या उन्हात बसावे त्या पासून आपल्याला व्हिटॅमिन मिळते. दररोज असे करणे शक्य नसल्यास जमेल तेव्हा करावे. असे केल्याने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होणार नाही.
 
* मसाज करावे - शरीरामध्ये रक्त विसरण चांगले होण्यासाठी आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी स्पा किंवा मसाज करावी असे केल्यास रक्त विसरण चांगले होईल आणि तणाव कमी होण्यास मदत मिळेल.
 
* दीर्घ श्वासोच्छ्वास घेणे - दर रोज सकाळी प्राणायाम करावे जेणे करून आपले फुफ्फुस चांगल्यारीत्या कार्य करतील ताण दूर होईल. श्वसन तंत्र चांगले काम करतील. हृदय स्वस्थ राहील.
 
* मेडिटेशन करणे - मेडिटेशन करून आपण आपल्या शरीरास तेजवान आणि निरोगी ठेऊ शकतो. मेडिटेशन कामाच्या ताणाला कमी करते.
 
* प्रथिनं आहारात घ्यावे  - नियमाने व्यायाम करत असल्यास आपल्या आहाराकडे लक्ष द्या. जेवणात प्रथिनांचा समावेश करा. दूध, बदाम, चणे खावे. व्यायामानंतर चणे खावे. ह्यात भरपूर प्रमाणात प्रथिन असतात. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
 
* डोळ्यांना विश्रांती द्या - आजचे युग कॉम्पुटरचे आहे. दिवस रात्र कॉम्पुटर आणि लॅपटॉप वरूनच सर्व काम केले जातात. त्यामुळे कॉम्प्युटर स्क्रीन पासून निघणाऱ्या किरणांमुळे डोळ्याला इजा होऊ शकते. त्यासाठी डोळ्यांना आराम द्या 2 -3 मिनिटे डोळे बंद करून बसा. असे केल्यास डोळ्याचा ताण कमी होईल. अधून मधून आपले डोळे थंड पाण्याने धुवा.

* धावणे- आजच्या धावपळीच्या जगात जो बघा तो धावत आहे. पण हे असं धावणे शरीरांवर वेगळाच प्रभाव टाकते. काही लोक आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करतात, जॉगिंगला जातात. पण काही कारणास्तव वेळ मिळत नसल्यास जेव्हा वेळ मिळेल स्वतःच्या जागेवरच धावावे. धावल्याने रक्त विसरण चांगले होते आणि शरीर निरोगी राहत. वेळोवेळी आपल्या चिकित्सकांचे योग्य तसे मार्गदर्शन घ्या. स्वस्थ राहा मस्त राहा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती