World Hemophilia Day हिमोफिलिया एक अनुवांशिक आजार

शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (06:39 IST)
हीमोफीलीया एक आनुवंशिक आजार आहे. ह्या आजारामध्ये रक्त गोठत नाही म्हणजे आपल्याला काही जखम झाल्यावर रक्तस्त्राव होता परंतू रक्तातील काही घटकांमुळे रक्तस्त्राव थांबतो यालाच रक्त गोठणे असे म्हणतात परंतू ही प्रवृत्ती एखाद्या व्यक्तीच्या रक्तामध्ये नसली किंवा कमी प्रमाणात असती त्याला हिमोफिलिया आहे असे म्हटलं जातं.
 
शरीरांमधील रक्त प्रोटीन ज्याला क्लाटींग फॅक्टर देखील म्हटले जाते. ह्याचा कमतरतेमुळे हा आजार होतो. या रक्त प्रोटीनचे कार्य वाहत्या रक्ताला जमवून ठेवणे आहे. 

भारतात अश्या रुग्णाची संख्या कमी आहे. या आजारात शरीरांतील कुठल्याही भागास लागल्यावर रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतो त्यामुळे रुग्ण मरण पावतो. हा आजार बहुतांश पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. हा एक आनुवंशिक आजार आहे. रक्तामध्ये थ्राम्बोप्लास्टीनंच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. थ्राम्बोप्लास्टीनमध्ये रक्ताला जमविण्याचे गुणधर्म असते. रक्तामध्ये याचा कमतरतेमुळे रक्त वाहणे कमी न झाल्याने रुग्ण मरण पावतो.
 
लक्षणे -
* शरीरांवर हिरवे- निळे डाग दिसू लागतात.
* नाकातून रक्त वाहू लागते.
* डोळ्यांमधून रक्त वाहू लागते.
* हाडांमध्ये सूज येते.
 
निदान
एक अनुवांशिक तपासणीद्वारे यावर निदान केले जाते. यासाठी त्वरित वैद्यकीय व्यवस्थापन प्रदान करण्याची गरज असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती