बर्याचदा व्यायाम करूनही वजन नाही, तर उभे राहून ते कसे घटेल, अशी शंका कदाचित तुम्हाला येईल. पण हे खरे आहे. दिवसभरात सुमारे सहा तास उभे राहिल्याने शरीराचे अतिरिक्त वजन कमी केले जाऊ शकते.
एका ताज्या अध्ययनात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, उभे राहिल्याने बसून राहण्याच्या तुलनेत दर मिनिटाला 0.15 कॅलरीचा जास्त खप होतो. समजा 65 किलो वजनाची एखादी प्रौढ व्यक्ती बसण्याऐवजी दिवसातून जवळपास सहा तास उभी राहिली तर त्याच्या 54 कॅलरी जास्त खर्च होतात.
अमेरिकेतील मायो क्लीनिक इन रोचेस्टरचे प्राध्यापक फ्रान्सिस्को लोपेज जिमेनेज यांनी सांगितले की, उभे राहिल्याने फक्त अतिरिक्त कॅलरीचाच खप होतो असे नाही तर त्यामुळे स्नायूंच्या गतीद्वारे हृदयविकाराचा झटका, पक्षघात आणि मधुमेहाचे प्रमाण की होण्यासही मदत होते. त्यामुळे उभे राहण्याचा फायदा वजन नियंत्रित ठेवण्यापेक्षाही कितीतरी जास्त आहे.