Fitness solutions'फिटनेस'चे सोपे उपाय

शुक्रवार, 28 जुलै 2023 (18:31 IST)
Fitness solutions जास्तच जास्त महिला आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. आपला पती आणि मुलं यांची ते चांगली काळजी घेतात. मात्र या धकाधकीत त्या आपल्याकडेच पाहायला विसरतात.
 
अनेक महिला म्हणतात की मला स्वत:च्या आरोग्याकडे पाहायला वेळ नाही. मात्र आपल्यासाठी काही साधे आणि सहज असे उपाय आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचं फिटनेस कायम ठेऊ शकतात.
 
रिसर्चने लक्षात आलं आहे की, झोप कमी झाल्यानेही वजन वाढतं. झोप कमी झाल्याने सारखी चिडचिड होत असते. 
 
तणावाशी संबंधित हार्मोन्स शरीराचं पाणी प्रमाणापेक्षा जास्त वाढवतात. त्यामुळे वजन वाढते आणि तुमची झोप होत नाही, तुम्ही व्यायाम करायलाही कंटाळा करतात आणि वजन वाढत असते.
 
नॉन व्हेज जेवणात खूप सारे पोषक तत्त्व असतात. मात्र तेवढय़ा प्रमाणात फॅटस्ही त्यात दिसून येतात. या उलट साधी पोळी भाजी खाल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. तुमच्या खाण्यात दाळ, हिरवा भाजीपाला जरूर मोठय़ा प्रमाणात असला पाहिजे.
 
नारळ पाण्यात फॅटस् आणि कॅलरी अजिबात नसते, त्यात अतिरिक्त वजन वाढत नाही. दही आणि दुसरे डेअरी प्रॉडक्टस खातांना लो फॅट ऑप्शन्स आहेत, त्यांना ट्राय करायला हरकत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती