अशावेळी घाबरणे, अर्ध चेतना येणे, डोळ्याच्या पुढे अंधारी येणे, नाडीची गती मंद होणे असे त्रास उद्भवू लागतात. या अवस्थेत शरीराला उन्हाळ्याची लू धरून ठेवते.
आपल्या शरीरांवर उष्णतेची लू का जाणवते ? याची अनेक कारणे आहेत, जसे शरीरात पाण्याची कमतरता, शरीरातील मीठेचे प्रमाण एकाएकी कमी होणं, उन्हात सतत काम करणे, घरातून उपाशी निघून उन्हात फिरणे, उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिणे.
उपचार म्हणून या दिवसात भरपूर पाणी प्यावे. शक्योत्तर दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणे टाळावे. पडावे लागलेच तर हात-पाय, चेहरा सर्व झाकून निघावे. उन्हाचा चष्मा वापरावा. तसेच उन्हातून लगेच एकदम थंड जागेवर जाणे टाळावे. गार पाणी पिण्यापेक्षा मातीच्या घड्यातील पाणी प्यावे. चक्कर वाटत असल्यास एनर्जी ड्रिंक घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी कांदा किसून तळहात आणि तळपायावर लावावा. याने आराम मिळतो.