1 जेवणाचे ताट - जेवताना आपल्या पुढचे ताट सरकले तर आपल्या घरी पाहुणा येणार अशी आपली समजूत आहे आणि तो शुभ शकुन समजावा. तसेच जेवण्याचे आमंत्रण येण्याची पूर्व सूचना समजली जाते.
2 शाई - महत्वाचा कागदपत्रांवर जर का शाई सांडली, अगर शाईचा डाग पडला तर कार्यसिद्धी होण्याची ती पूर्व सूचना समजावी. अंगावरील कपड्यांवर शाई सांडल्यास शुभ असते, परंतु अंगावर सांडल्यास अशुभ असते.
3 तसबीर - घरातील तसबीर जमिनीवर पडून फुटल्यास अशुभ असते. मित्रांकडून वाईट वार्ता कळण्याची ती पूर्व सूचना समजली जाते. प्रिय व्यक्तीशी बेबनाव होते.
4 चमचा - खाताना चमचा खाली पडणे, हे तातडीने बोलावणे येण्याचे लक्षण समजले जाते.
5 आगकाड्या - आगपेटीतील काड्या एकदम हातून सांडणे हे शुभ लक्षण आहे. कार्य सिद्धी होण्याचा तो शकुन होय.
6 कात्री - कात्री हातातून खाली पडणे किंवा तिचे पाते मोडणे ही भांडणतंटा होण्याची लक्षणे आहे.
7 काचेचा ग्लास - पांढरा ग्लास फुटणे शुभ तर रंगीत ग्लास फुटणे अत्यंत अशुभ मानले जाते.
8 घड्याळ - हातातील घड्याळ बंद पडणे अगर फुटणे याचा अर्थ धनी (नवरा) आर्थिक संकटात सापडण्याची सूचना असते.
9 बांगडी - स्त्रीच्या हातातली बांगडी फुटली तर ते अशुभ मानले जाते.
10 निरांजन - पेटलेले नीरांजन हातातून पडल्यास ती मोठ्या संकटाची पूर्व सूचना मानली जाते.
11 आरसा - फुटलेल्या आरश्यात टन पाहणे अशुभ मानले जाते.
12 केरसुणी - अनावधानाने घरातल्या केरसुणीला पाय लागल्यास अशुभ समजावे. संध्याकाळी केरसुणीने केर काढल्यामुळे धननाश होतो.