Prevent Heart Attack :हार्टअटॅक टाळण्यासाठी हे उपाय अवलंबवा

शनिवार, 11 मार्च 2023 (16:38 IST)
अलीकडे हार्टअटॅकचे प्रमाण वाढले आहेत.आजकाल लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त झाली आहे की आजच्या या धकाधकीच्या काळात त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळच नाही. जो बघा तो पळतच आहे आणि आपल्या सर्व गरज पूर्ण करण्याच्या मागे आपापल्यापरीने झटत आहे. प्रयत्नशील आहे. अश्या परिस्थितीत त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबातच वेळ नाही. परिणामी शरीर बऱ्याच रोगांनी ग्रस्त होतो. आपले हृदय कमकुवत होऊ लागत. आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका संभवतो. त्यासाठी सर्वात गरजेचं आहे आपल्या व्यस्त असलेल्या धावपळीच्या जीवनशैली मधून थोडा वेळ काढणे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं. माणसाच्या अश्या बऱ्याच चुकीच्या सवयी असतात, जे हृदयाच्या रोगास कारणीभूत ठरतात. आपण जर का आपल्या या चुकीच्या सवयींना सोडलं आणि आपल्या हृदयाला बळकट बनवलं. तर या हृदयविकाराच्या झटका येण्याच्या धोक्याला बऱ्यापैकी कमी करू शकतो. हार्टअटॅक टाळण्यासाठी हे उपाय अवलंबवा 
 
1  धूम्रपान सोडा - 
धूम्रपान म्हणजे सिगारेट ओढणे आजकाल जणू फॅशनच बनले आहे. लोक आपल्या आरोग्याचा विचार न करता सिगारेट ओढण्याची सवय लावून घेतात, जी नंतर त्यांचा साठी हानिकारक ठरते. सिगारेट ओढल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजार होण्याचा धोका वाढतच नाही, तर हे हृदयविकाराच्या झटका होण्याचे जोखीम देखील वाढवतो. म्हणून आपल्या हृदयाला निरोगी आणि बळकट ठेवायचे असल्यास आजच धूम्रपान करणं थांबवा.
 
2 वजन नियंत्रणात ठेवा - 
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त वजन असल्यामुळे हृदय विकाराचा धोका वाढतो या व्यतिरिक्त इतरही अनेक रोग शरीराला वेढतात. म्हणून जर का आपल्याला आपल्या हृदयाला बळकट आणि निरोगी करावयाचे असल्यास, तर कमी चरबी आणि कमी साखरयुक्त आहार घ्या. तसेच, जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खा आणि दररोज व्यायाम करा.
 
3 मद्यपान करू नका - 
जास्त प्रमाणात मद्यपान करणे हे आरोग्यास हानिकारक असतं. या मुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी निगडित आजार होण्याचा धोका वाढतो. जास्त मद्यपान केल्यानं हृदय कमकुवत होतं. म्हणून आपल्या हृदयाला बळकट करण्यासाठी मद्यपानाचे सेवन कमी करावं किंवा करूच नये. हे जास्त सोयीयस्कर आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे.
 
4 पाणी भरपूर प्या - 
पाणी आपल्या शरीरासाठी तेवढेच महत्त्वाचं आहे जेवढा महत्त्वाचा श्वास आहे. पाण्याच्या अभावामुळे माणसाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात, तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील वाढते. म्हणून दररोज किमान दोन लीटर पाणी प्यावं, जेणे करून शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये आणि आपण निरोगी राहाल, आपले हृदय बळकट होईल.
 
5 व्यायाम करा -
दीर्घायुष्यासाठी हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर  दररोज व्यायाम करण्याची सवय लावावी लागेल. निरोगी हृदयासाठी प्रौढांना दररोज 150 मिनिटे मध्यम व्यायामाची आवश्यकता असते. हृदयासाठी व्यायामाचा सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे एरोबिक व्यायाम, ज्यामध्ये चालणे, जॉगिंग, सायकलिंग किंवा पोहणे यांचा समावेश होतो. दिवसातून 30 मिनिटे व्यायाम केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती