हिमोग्लोबीन हे प्रत्येक महिलेच्या स्वाथ्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. खासकरून गर्भवती महिलांसाठी शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी योग्य असणे अत्यंत आवश्यक असते. सुदृढ बालकास जन्म देण्यासाठी गर्भवती महिला कुपोषणाने ग्रस्त असू नये. कुपोषण अथवा अॅानेमिया यांनी ग्रस्त असलेल्या महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
शरीरामध्ये हिमोग्लोबीन कमी असल्यास गर्भकालाच्या पहिल्या तीन महिन्यात काहीही देता येऊ शकत नाही. परंतु तीन महिन्यांतर अधिक प्रोटीनयु्रत पदार्थ, बीन्स, वांगे, पालक आदी खाऊ घालावे. लोहतत्त्वाची मात्रा वाढविण्यासाठी काही औषधेही दिली जातात. परंतु गर्भारकाळातील तिसर्याग तीन महिन्यात म्हणजेच सहा ते नऊ महिन्यांच्या दरम्यानही महिला कुपोषणाने ग्रस्त झाल्यास ब्लड ट्रान्सफ्यूजनद्वारे लोहतत्त्वाची पूर्तता केली जाते.