शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उलट ते बदामाचे पर्याय मानले जाते.बदाम असणारे सर्व पोषक घटक शेंगदाण्यात सहज उपलब्ध असतात.परंतु बदाम महाग आहे आणि शेंगदाणे स्वस्त आहे आपण बदाम ऐवजी सहज शेंगदाणे खाऊ शकता.एक लिटर दुधाऐवजी 100 ग्राम कच्च्या शेंगदाण्यात जास्त प्रोटीन असत. शेंगदाण्याबरोबरच शेंगदाणा तेलाचेही बरेच फायदे आहेत. हे जंतांचा नायनाट करण्यात मदतगार आहे.
चला तर मग जाणून घेऊ या शेंगदाण्याच्या फायद्यां बद्दल.
1 हाडांना बळकट करत -शेंगदाण्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. शेंगदाण्यातील पोषक घटकांपासून शरीराला व्हिटॅमिन डी आणि केल्शियम मिळतं.बदामाच्या ऐवजी आपण सहज हे खाऊ शकता.