कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने आणि झपाट्याने वाढत आहे. या संसर्गापासून बचाव करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. या साठी लॉक डाऊन चे पालन करणे आपले कर्तव्य आहे काही लोक रुग्णालयात दाखल होऊन या आजारावर उपचार घेत आहे तर काही लोक होम आयसोलेशन म्हणजे गृह विलगीकरण मध्ये राहूनच या आजारावर उपचार घेत आहे. होम आयसोलेशन मध्ये राहणाऱ्या रुग्णांना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे आहे.चला तर मग जाणून घेऊ या.
* कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांची खोली वेगळी असावी.त्याचे अंथरून,पांघरून,जेवण्याची भांडी वेगळी असावी.
* रुग्णाच्या खोलीत जातांना ट्रिपल लेयर मास्क घालावा.
* रुग्णांची भांडी स्वच्छ करताना ग्लव्स घालूनच भांडी स्वच्छ करावी. ग्लव्स काढून साबणाला देखील स्वच्छ करावे.