योग्यवेळी आहार घेणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. त्यासंदर्भात विचार करायचा तर रात्री झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवावे, असा सल्ला नेहमीच दिला जातो. मात्र काम किंवा इतर कारणांमुळे होणारे जागरण, लवकर जेवणे यामुळे रात्री उशिरा भूक लागू शकते. अशावेळी वेफर्स, चॉकलेट्स, आईस्क्रीमसारखे अनारोग्यदायी पदार्थ खाल्ले जातात. मात्र रात्री भूक लागल्यानंतर खाता येणारे काही आरोग्यदायी पदार्थही आहेत. अशा पदार्थांमुळे तुमच्या कॅलरीही वाढणार नाहीत आणि रात्री त्रासही होणार नाही. कोणते आहेत हे पदार्थ? जाणून घेऊ.