CoronaVirus : भाज्या आणि फळांना Disinfect कसं करावं, Expert Advice

गुरूवार, 11 जून 2020 (08:09 IST)
कोविड 19 च्या वाढत्या धोक्यामुळे आपल्याला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. घरातून बाहेर जाऊन आणलेली प्रत्येक वस्तूंकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जेणे करून हा विषाणू आपल्या घरामध्ये येता कामा नये. 
 
बाहेरून जे सामान आपण घरामध्ये आणाल, त्याला स्वच्छ करूनच घरात ठेवावे. जर आपण फळ आणि भाज्यांबद्दल बोलत आहोत तर त्यांना देखील सेनेटाईझ करूनच साठवून ठेवावे. जेणे करून आपण पूर्णपणे सुरक्षित राहाल.
 
आम्ही आहारतज्ज्ञ डॉ. विनिता मेवाडा यांच्याशी संवाद साधला आणि जाणून घेतले की फळ आणि भाज्यांचे निर्जंतुकीकरण कसं करावं आणि या कोरोना व्हायरस पासून कसं वाचावं. 
 
आहारतज्ज्ञ डॉ. विनिता मेवाडा म्हणतात की जेव्हा पण आपण घरात फळ किंवा भाज्या घेऊन येता, तर त्यांना स्वच्छ न करता ठेवू नये. सर्वात आधी त्यांना सेनेटाईझ करावं. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा व्हिनेगर घाला. ह्या पाण्यामध्ये फळ आणि भाज्या टाकून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
 
5 लीटर पाण्यामध्ये 80 ग्राम बेकिंग सोडा मिसळा. या पाण्यामध्ये फळ आणि भाज्यांना 15 ते 20 मिनिटा पर्यंत टाकून ठेवा नंतर स्पॉंजने चोळून चोळून स्वच्छ करत स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने भाज्यांमधील सर्व जंत आणि विषाणू असल्यास स्वच्छ होतील.
 
पालेभाज्यांचा वरचा थर काढून त्यांना कोमट पाण्यात मीठ टाकून कमीत कमी 5 मिनिटे भिजवून ठेवा. जर भाजी कुठे कापली गेली असल्यास तो भाग चाकूने काढून टाका. म्हणजे कोणत्याही प्रकारे विषाणूंचा धोका उद्भवणार नाही.
 
भाज्यांना स्वच्छ करण्यासाठी भाज्यांचा ब्रशचा वापर करावा. भाज्यांना नळाखाली ठेवून चांगल्या प्रकारे चोळून चोळून स्वच्छ करावं, जसे की बटाटे, गाजर, वांगे सारख्या कडक भाज्या ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती