जेवण्यानंतर लस्सी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

मंगळवार, 14 मे 2024 (21:37 IST)
सध्याच्या धावपळीच्या धकाधकीच्या आयुष्यात लोक स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहाराचे सेवन करतात. काही लोक उन्हाळ्यात आपल्या आवडीचे पेय पितात काही जलजीरा पितात तर काही लस्सी पितात. जेवणानंतर लस्सीचे सेवन करत असाल तर हे शरीरासाठी हानिकारक असू शकतं.एवढेच न्हवे तर रात्री झोपण्यापूर्वी देखील लस्सीचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेवल्यानंतर लस्सी पिण्याचे नुकसान जाणून घ्या.
 
साखर वाढू शकते
अनेक डॉक्टरांचा असा विश्वास आहे की मधुमेहाच्या रुग्णांनी लस्सीचे सेवन केल्यास त्यांची साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत त्याचा तुमच्या किडनीवरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी लस्सी पिणे टाळावे.
 
वजन वाढणे- 
लस्सी बनवण्यासाठी फुल फॅट दूध, साखर, मीठ आणि मसाल्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे तुमच्या कॅलरीजवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. म्हणून झोपण्यापूर्वी लस्सीचे सेवन करणे टाळावे. 
 
सर्दी होऊ शकते
उन्हाळ्याच्या हंगामात, लोकांना थंड लस्सी प्यायला आवडते, परंतु यामुळे शरीरात श्लेष्मा तयार होण्याच्या प्रक्रियेस चालना मिळते. यामुळे खोकला, सर्दी, कफ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
 
त्वचेच्या समस्या होणे
लस्सीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेशी संबंधित समस्या होऊ शकतात. तसेच ज्यांना संसर्गाचा त्रास आहे त्यांनी लस्सी पिणे टाळावे. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited by - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती