उन्हाळ्याच्या काळात, आपले शरीर थंड ठेवण्यासाठी योग्य अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये हायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असलेले पदार्थ समाविष्ट आहेत. उन्हाळ्यात थंड पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात पुदिन्याच्या पानाचे सेवन केल्याने फायदे मिळतात. चला तर मग पुदिन्याचे मिळणारे फायदे जाणून घेऊ या.
उन्हाळ्यात पचनक्रिया बिघडते, ज्यामुळे गॅस, अपचन, आम्लता आणि पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवतात. पुदिना खाल्ल्याने या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. त्यात असलेले मेन्थॉल पोटाच्या स्नायूंना शांत करते आणि पचनास मदत करते. जेवणानंतर पुदिन्याचा रस किंवा पुदिन्याच्या चहाचे सेवन करा.
श्वासाची दुर्गंधी दूर करते
पुदिना हा एक नैसर्गिक तोंडाला ताजेतवाने करणारा पदार्थ आहे. त्यात असे गुणधर्म आहेत जे तोंडातून येणारी दुर्गंधी दूर करतात. पुदिना दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यास मदत करतो. तुम्ही घरी पुदिन्याची पाने माउथवॉश म्हणून बनवू शकता आणि वापरू शकता.
उष्णतेमुळे डोकेदुखी वाढते हे टाळण्यासाठी पुदिनाच्या पानाचे सेवन करावे. पुदिन्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. मानसिक ताण कमी होतो. डोक्याला पुदिन्याचे तेल लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.
वजन कमी होते
पुदिनाचे सेवन केल्याने पचन सुधारून चयापचय वाढते आणि वजन नियंत्रणात राहते. पुदिन्याला यकृताचे टॉनिक मानले आहे. याच्या सेवनाने पित्त विकारात आराम मिळतो. शरीराला व्हिटॅमिन सी, ए आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
उन्हाळ्यात मुरूम, पुरळ, पुटकुळ्या, जळजळ, खाज,खरूजच्या समस्या उदभवतात. पुदिन्याचा पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचा ताजीतवानी होते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.