आपले पाय मजबूत ठेवा, नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा
शनिवार, 12 जून 2021 (12:10 IST)
▪️ आपण वयाने वाढतो तेंव्हा आपले पाय नेहमी मजबूत असायला हवेत.
▪️ आपण जसे वृध्दत्त्वाकडे झुकत असतो किंवा वृध्द होतो तेंव्हा आपले केस पांढरे होणे किंवा त्वचा ढिली होणे, सुरकुतणे या नैसर्गिक गोष्टी असल्याने घाबरायचं कारण नाही.
▪️ प्रिव्हेन्शन या अमेरिकन नियतकालिकात लिहिल्याप्रमाणे आयुष्य लांबताना दिसणाऱ्या लक्षणांमध्ये पायाच्या भक्कम स्नायूंना सर्वात वरचे स्थान दिले आहे आणि ते महत्त्वाचे तथा आवश्यक आहे.
▪️ दोन आठवडे तुमच्या पायांना हालचाल नसेल तर तुमच्या पायांची मजबुती १० वर्षांने कमी झालेली असेल.
▪️ डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असं आढळलंय की, तरूण अथवा वृध्द दोघांमध्ये पायांच्या हालचाली दोन आठवडे थांबल्यास पायांच्या स्नायूंची शक्ती एक तृतीयांशाने कमी म्हणजेच २०/३० वर्षांनी वृध्द झाल्यासारखी होते.
▪️ एकदा आपल्या पायांचे स्नायू दुबळे झाले तर बरे होण्यास खूप काळ लागतो. नंतर कितीही पूर्वीसारखी हालचाल करण्याचा प्रयत्न अथवा व्यायाम केला तरी फारसा फरक पडत नाही.
▪️ म्हणून चालण्याचा नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
▪️ आपल्या संपूर्ण शरीराचे वजन/भार पायांवर पडतो किंवा पायांना पेलावा लागतो.
▪️ आपल्या शरीराचा भार सोसणारे आपले पाय म्हणजे जणू खांबच आहेत.
▪️ गंमत म्हणजे शरीरातील ५०% हाडं आणि ५० % स्नायू आपल्या दोन पायांत असतात.
▪️ मनुष्याच्या शरीरातील सर्वात बळकट सांधे आणि हाडं हीसुध्दा पायांतच असतात.
▪️ मनुष्याच्या शरीराचा महत्त्वाचा भार वाहणारा असा एक त्रिकोण मजबूत हाडं, बळकट स्नायू आणि लवचिक सांधे यांच्यास्वरूपात तयार होतो.
▪️ मानवाच्या शरीराच्या ७०% हालचाली आणि आयुष्यातील शक्ती खर्ची पडते ती दोन पायांमुळेच.
▪️ तुम्हाला माहीत आहे का , की, तरूण माणसाच्या मांड्यांमध्ये एक छोटी मोटार कार उचलण्याइतकी शक्ती असते ?
▪️ पाय हे शरीराच्या चलनवलनाचा केंद्रबिंदु असतात.
▪️ दोन्ही पायात मिळून शरीरातील एकूण नसांपैकी ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या असतात आणि त्यांतून ५०% रक्त वाहात असतं.
▪️ अवघ्या शरीराला जोडणारे ते एक रक्ताभिसरणाचे मोठे जाळें आहे.
▪️ जेंव्हा पाय सशक्त असतात तेंव्हाच रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो. म्हणून ज्यांच्या पायांचे स्नायू बळकट त्यांचे ह्रदयसुध्दा निश्चितच बळकट असते.
▪️ वार्धक्य पायांकडून सुरु होऊन पायांपासून वर सरकत असते.
▪️ जसजसे वार्धक्य वाढते तसतसे शरीरातील पायांकडून मेंदूकडे जाणाऱ्या संदेशाची अचूकता आणि त्यांचा वेग कमी होत जातात. तारुण्यात तसे नसते.
▪️ तसेच हाडांचे तारणहार समजले जाणारे शरीरातील कॅल्शियम काळाबरोबर कधीतरी नष्ट होते, त्यामुळे म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये अस्थिभंग लवकर होतो.
▪️ अस्थिभंग (Bone fractures) वयस्क लोकांमध्ये अनेक गुंतागुंतीच्या मालिकेला कारण ठरू शकतो, विशेषतः मेंदूतील रक्तस्रावासारखे जीवघेणे आजार.
▪️ पायांचे व्यायाम केंव्हाही सुरू करता येतात, अगदी साठीनंतरसुध्दा.
▪️ आपले पाय काळाबरोबर वृध्द होत असले तरी पायांचे व्यायाम हे आयुष्यभरासाठीचे कार्य असावे.
▪️ केवळ पायांची बळकटी वाढवणेदेखील वृध्दत्व थोपवू शकते.
▪️ रोज किमान ३०/४० मिनिटे चाला, जेणेकरून पायांना पुरेसा व्यायाम मिळून पायांचे स्नायू सशक्त राहतील.