Healthy food : संत्री व्यतिरिक्त ही फळे व्हिटॅमिन-सीची कमतरता पूर्ण करतात

मंगळवार, 4 मे 2021 (13:43 IST)
1. मनुका- मनुका खाल्ल्याने रक्त वाढतं आणि यात आढळणार्‍या घटकांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. पाण्यात भिजवून याचे सेवन केल्याने कमजोरी दूर होते. आपण मुनकावर काळं मीठ लावून देखील खाऊ शकता.
 
2. द्राक्ष- होय, द्राक्षांमध्ये देखील भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं. याचे सेवन केल्याने टीबी आणि कर्करोग या सारखे आजार दूर होतात. संत्राऐवजी आपण द्राक्षांचे सेवन करु शकतात.
 
3. लिंबू- लिंबाला संत्र्याचा पर्याय म्हणजे चुकीचे ठरणार नाही. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं. अनेकदा लिंबू खाल्ल्याने हाड आणि स्नायूंच्या वेदनेपासून आराम होतो.
 
4. स्ट्रॉबेरी- यात व्हिटॅमिन सीची 84.7 मिलीग्राम प्रमाण आढळतं. याचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचे ठरतं.
 
5. ब्रोकली- हल्ली ब्रोकली ट्रेंडिंग फूड आहे. तरुण मोठ्या जोमाने त्याचा वापर करतात. यात सुमारे 132 मिली ग्रॅम व्हिटॅमिन सी आढळतं. याचे सेवन केल्याने धोकादायक 
 
आजारांपासून सुटका होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती