कमजोर इम्यूनिटी बूस्ट करण्याचे उपाय

शनिवार, 24 एप्रिल 2021 (10:59 IST)
कोरोना व्हायरस संसार्गाचा धोका सर्वांना आहे तरी ज्यांची इम्युनिटी कमजोर असेल त्यांना धोका अधिक असल्याचे सांगितले जात आहे. शरीराची रोग प्रतिकारक क्षमता कमजोर असल्यामुळे व्हायरसला लढा देणं कठिण होतं आणि स्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमकुवत प्रतिकारशक्ती असल्यास, कोरोनाचा संसर्ग झाल्यास आपल्याला श्वास घेण्यात त्रास होण्यासारखी गंभीर लक्षणे देखील असू शकतात. अशा परिस्थितीत, हे जाणून घेणे महत्वाचे आहे की ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती आधीपासूनच कमकुवत आहे किंवा जे वारंवार आजारी आहेत, त्यांची प्रतिकारशक्ती कशी मजबूत करावी, ज्याने ते कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यात सक्षम राहतील. 
 
कमजोर इम्यूनिटी असल्यास शरीरात लवकर प्रवेश करेल व्हायरस
ज्यांची इम्यूनिटी कमजोर असते त्यांच्या शरीरावर व्हायरस पटकन हल्ला करतात आणि त्याची वाढ दुप्पट वेगानं होऊ लागते. नाक, तोंड याहून प्रवेश करुन व्हायरस फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यानंतर शरीराला हानी पोचवण्यास सुरुवात करतं. या परिस्थितीत श्वास घेण्यास त्रास जाणवू लागतो. ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते.
 
कमजोर इम्यूनिटीचे लक्षणं
जर आपण वारंवार आजारी पडत असाल, महिन्यातून दोन वेळा सर्दी होत असेल तर हे कमजोर इम्युनिटीचे लक्षणं आहेत. ज्यांचा जखमा लवकर भरत नाही, गॅसचा त्रास होणे, वर्षातून दोनदा न्यूमोनिया असणे, अतिसार इत्यादींचा त्रास कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे देखील होतो.
 
जर आपली प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे आणि आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर शरीराने व्हायरसचे भार कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दिवसातून दोन ते तीन वेळा स्टीम करणे. गरम पाणी पिणे. फुफ्फुसांपर्यंत व्हायरस झाल्यास अशा प्रकारचे योगाभ्यास करा, ज्यामुळे फुफ्फुस मजबूत होतात. हेल्दी डायट घ्या. हिरव्या पालेभाज्या आणि आंबट फळांचे सेवन करा. लिंबू पाणी प्या. संत्री खा. याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. मैदा, मीठ, साखर, बाजारातील वस्तू, जंक फूड मुळीच खाऊ नका. आराम करा. किमान आठ तास झोप काढा. नियमित रुपाने योग, मेडिटेशन, हलका व्यायाम करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती