देशात कोरोनाने पुन्हा थैमान मांडला आहे आणि दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. नवीन स्ट्रेन आल्याने लक्षणं देखील बदलली आहेत. शरीरातील काही बदल संकेत देतात अशात माहित असावं की हे बदल कोणते आहेत ते. अनेकांना कोरोना असून चाचणी नॅगेटिव्ह येत आहे तर काही पॉझिटिव्ह होऊन गेलं तरी त्यांच्या लक्षात आले नाही. गेल्या वर्षी सर्दी-खोकला, ताप, घसा खवखणे इतर लक्षणं दिसून आली तर इतर लक्षण काय आहेत जाणनू घ्या-
ही आहेत कोरोनाची नवी लक्षणं
डोळे लाल होणे
जास्त वेळ स्क्रीन बघितल्याने देखील डोळे लाल होतात परंतू कोरोना संसर्ग झाल्यास डोळे लाल होण्यासह डोकेदुखी आणि ताप ही लक्षणंही दिसून येतात.
लूज मोशन
सतत दोन-तीन दिवस लूज मोशन होणे हे देखील संकते असू शकतात. पचनसंस्थेवर परिणाम होऊन डायरिया, मळमळणे, भूक न लागणं अशी लक्षणं संकेत असू शकतात.
मेमरी डिसऑर्डर
स्मरणशक्तीवर परिणाम होणे अर्थात एकाग्रतेच कमी, अस्वस्थ जाणवणे, निर्णय घेण्याची क्षमते गोंधळ, विसर पडणे अशी काही लक्षणं कोरोनाच्या संसर्गामुळेही असू शकतात.