हो हे खरं आहे, दुधाने पोषण प्राप्त करण्यासाठी आपण दूध उकळून पित असला तरी एका शोधात हे स्पष्ट झाले आहे की वारंवार दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्व नष्ट होऊन जातात. असे केल्याने आपल्याला दुधाचे ते पोषक तत्त्व प्राप्त होणे शक्य नाही ज्यासाठी आपण दुधाचे सेवन करता.
रिसर्चप्रमाणे, 17 टक्के स्त्रियांना हे माहीत नसतं की वारंवार दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्व नष्ट होतात. तसेच 59 टक्के स्त्रियांना वाटतं की दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्वांची वृद्धी होते आणि 24 टक्के स्त्रियांना वाटतं की दूध उकळल्याने काही फरक पडत नसतो.