डोकेदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास आपण विक्स वेपोरबचा वापर करतो. मात्र विक्स वेपोरबचा केवळ सर्दी, खोकल्यासाठीच वापर होत नाही तर याचे अनेक फायदेही आहेत, जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील.
* आपले कपडे व त्वचेवर विक्स वेपोरब लावल्यास डास दूर होतील.
* विक्स वेपोरबच्या वापराने सायनसमुळे होणारी डोकेदुखी बरी होण्यास मदत होते.
* ऐकायला कदाचित हे विचित्र वाटेल, मात्र विक्स वेपोरब पिंपल्सवर लावल्यास पिंपल्स बरे होतात.
* अनेकदा नाटक, सीरियल्सच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांना खोटे अश्रू काढावे लागतात, तर थोडासा वेपोरब डोळ्यांच्या खाली लावा.
* कीटक, पतंगांनाही दूर राखण्याचे काम विक्स वेपोरब करते.
* खाण्याच्या टेबलावरून माशा दूर करायच्या असल्यास टेबलावर विक्स वेपोरबची डबी उघडून ठेवावी.
* खरचटल्यास विक्स वेपोरबमध्ये थोडेसे मीठ मिसळून खरचटलेल्या जागी लावा. जखम लवकर बरी होईल.
* स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठीही विक्स वेपोरबचा वापर होतो. नियमितपणे स्ट्रेच मार्कवर विक्स वेपोरब लावल्यास दोन आठवड्यांत तुम्हाला परिणाम दिसू लागतील.
* ड्राय स्किनसाठी विक्स वेपोरब एक मॉश्चमरायझर म्हणून काम करते.
* टेनिस एल्बोचा त्रास असल्यास विक्स वेपोरबचा तुम्हाला नक्की फायदा होईल. यातील मेंथॉल आणि कापरामुळे दुखणे बरे होते.
* तळपायाला भेगा पडल्यास त्यावर विक्स वेपोरब गुणकारी आहे.
* रात्री झोपताना विक्स वेपोरब लावल्यानंतर पायात सुती मोजे घालून झोपा.